गायवळ येथे कलापथकाने दिली राज्य सरकारच्या दोन वर्षातील योजनांची माहिती
- Get link
- X
- Other Apps
गायवळ येथे कलापथकाने दिली
राज्य सरकारच्या दोन वर्षातील योजनांची माहिती
वाशिम दि.०९(जिमाका) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. या सरकारने दोन वर्षाच्या काळात घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय आणि राबविलेल्या योजना व उपक्रमांची माहिती आज ९ मार्च रोजी कारंजा तालुक्यातील गायवळ येथे लोककलांच्या माध्यमातून उपस्थित ग्रामस्थांना देण्यात आली.
कार्यक्रमाला सरपंच पुष्पा राऊत,उपसरपंच मंगला व्यवहारे, ग्रामपंचायत सचिव श्री.राठोड, मुख्याध्यापक,शिक्षक वृंद,प्रतिष्ठित नागरिक अरुण राऊत व बाळकृष्ण व्यवहारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सूर्य लक्ष्मी शिक्षण,कला, क्रीडा व आरोग्य बहुउद्देशीय संस्थेचे कलापथक प्रमुख विलास भालेराव आणि त्यांच्या सहकलावंतानी राज्य शासनाने दोन वर्षात घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय व योजनांची माहिती उपस्थितांना देऊन राज्य शासनाने वाशिम येथे राज्यातील पहिले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशीय कृषी संकुल उभारण्याचा निर्णय घेऊन त्या संकुलाचे काम वेगाने पूर्ण होत असल्याचे सांगितले.जिल्ह्यातील शेतीचे चित्र बदलण्याची क्षमता या संकुलात असल्याची माहिती आपल्या कलापथक सादरीकरणातून कलावंतांनी विशद केली.
शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला गायवळ गावातील नागरिक तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना दूरदृष्टी या घडीपुस्तिकेचे वितरण करण्यात आले.उपस्थितांचे आभार कलापथक प्रमुख विलास भालेराव यांनी मानले.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment