माहिती कार्यालयात घेतली जल शपथ


माहिती कार्यालयात घेतली जल शपथ

             वाशिम, दि. 29 (जिमाका) : पाण्याचा वापर प्रत्येक व्यक्तीने काटकसरीने करावा. तसेच प्रत्येक व्यक्ती जल साक्षर होऊन जलशक्ती अभियानात सहभागी व्हावे. यासाठी या अभियानांतर्गत आज जिल्हा माहिती कार्यालयात जल शपथ घेण्यात आली. जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी जल शपथचे वाचन केले. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अलोक अग्रहरी, जिल्हा बाल संरक्षक अधिकारी भगवान ढोले, संरक्षण अधिकारी लक्ष्मण काळे, सामा

जिक कार्यकर्ता अनंदा इंगळे, अजय यादव, राजू जाधव, विजय राठोड, गजानन डहाके व अनिल कुरकुटे यांनी सुध्दा जल शपथ घेतली.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश