जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
वाशिम, दि. 25 (जिमाका) : २४ मार्च रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण
व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने व वाशिम जिल्हा कारागृह यांच्या
सहकार्याने जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांकरीता कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन
करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. संजय शिंदे होते.
न्यायदंडाधिकारी एम.एस. पदवाड यांनी उपस्थित कैद्यांना विधी प्राधिकरणामार्फत मिळणाऱ्या
मोफत विधी सहाय्याबाबत व कैद्यांचे अधिकार याबाबत, जिल्हा विधीज्ञ संघाचे कोषाध्यक्ष
अॅड. समाधान सावळे यांनी कैद्यांचे मुलभुत अधिकार व कायदेविषयक सेवा याबाबत मार्गदर्शन
केले.
न्या. श्री. शिंदे हे कैद्यांना मार्गदर्शन
करतांना म्हणाले,आपले पुढील जिवन सुंदर बनविण्यासाठी त्यांचा वेळ वाचन व शिक्षणावर
खर्च करावा.संचालन वरिष्ठ तरुंगाधिकारी भि.ना.राऊत यांनी केले.आभार जिल्हा कारागृह
अधीक्षक श्री. सोमनाथ पाडुळे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव
अॅड. एन. टी. जुमडे, डॉ. घुगे,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी व जिल्हा कारागृहातील
कैदी उपस्थित होते.
*******
Comments
Post a Comment