जागतिक महिला दिनानिमित्त शासकीय तंत्रनिकेतन वाशिम येथे सायबर सुरक्षाविषयी मार्गदर्शन
- Get link
- X
- Other Apps
जागतिक महिला दिनानिमित्त
शासकीय तंत्रनिकेतन वाशिम येथे सायबर सुरक्षाविषयी मार्गदर्शन
वाशिम दि.११(जिमाका) जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेअंतर्गत तक्रार निवारण समिती व निर्भया पथक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय तंत्रनिकेतन,वाशिम येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती महक स्वामी यांनी सायबर सुरक्षा याविषयावर मार्गदर्शन केले.
विद्यार्थिनींना समाजात घडणारे गुन्हे, सायबर गुन्हे व त्यापासून स्वतःची सुरक्षा,खबरदारी व उपाययोजना याबाबत श्रीमती स्वामी यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थिनीशी संवाद साधला.यावेळी मंचावर संस्थेचे प्राचार्य डॉ.बी.जी.गवलवाड, जिमखाना उपाध्यक्ष राहुल महाजन, तक्रार निवारण समिती अध्यक्षा प्रिया मोरे,निर्भया पथक समितीच्या समितीचे अध्यक्ष श्रीमती मनीषा मोरे उपस्थित होत्या.संचालन गरिमा वानखडे व रोहिणी राऊत यांनी केले.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment