महाडीबीटी पोर्टल : शिष्यवृत्ती व योजनांच्या अर्जासाठी 31 मार्च मुदत
- Get link
- X
- Other Apps
महाडीबीटी पोर्टल : शिष्यवृत्ती व योजनांच्या अर्जासाठी 31 मार्च मुदत
वाशिम, दि. 29 (जिमाका) : अनुसूचित जाती, विमुक्त
जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन योजनांचे शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील अर्ज स्विकारण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून नवीन प्रवेशित व नूतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. सन 2021-22 मधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फि, परीक्षा फी तसेच व इयत्ता 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांकरीता राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज https://mahadbtmahait.
अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन 2021-22 या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फि, परीक्षा फि तसेच 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांकरीता राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज परत पाठविण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 आहे. याबाबत कार्यवाही करुन पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचे लॉगीनला पाठवावे. ही मुदत अंतिम असून यानंतर सन 2020-21 या शैक्षणिक सत्राकरीता अर्ज परत कार्यालयास पाठविण्याची मुदतवाढ होणार नाही. याची जिल्हयातील सर्व शिष्यवृतीधारक विद्यार्थ्यांना या योजनांचे दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज भरण्यासाठी आपल्यास्तरावरुन कळवावे.
जिल्हयातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी आपल्यास्तरावरुन सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर सन 2021-22 या शैक्षणिक सत्रातील अर्ज भरण्यास अवगत करुन तसेच महाडीबीटी पोर्टल https:/dbtworkflow.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment