कलापथक कार्यक्रमातून सोहोळच्या ग्रामस्थांना दिली राज्य सरकारच्या दोन वर्षाची माहिती
- Get link
- X
- Other Apps
कलापथक कार्यक्रमातून
सोहोळच्या ग्रामस्थांना दिली
राज्य सरकारच्या दोन वर्षाची माहिती
वाशिम, दि. 10 (जिमाका) : विद्यमान राज्य सरकारला नुकतीच दोन वर्ष पुर्ण झाली आहे. राज्य सरकारने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय, राबविलेल्या योजना व उपक्रमांची माहिती तसेच जिल्हयात झालेल्या विकास कामांची माहिती जिल्हयातील नागरीकांना व्हावी यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमच्या वतीने आयोजित शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यात येत आहे. याच कार्यक्रमांतर्गत कारंजा तालुक्यातील सोहोळ या गावी 9 मार्च रोजी रात्री सुर्यलक्ष्मी शिक्षण, कला, क्रीडा व आरोग्य बहुउद्देशिय संस्था वाशिम या संस्थेचे प्रमुख कलावंत लोककवी विलास भालेराव आणि त्यांच्या सहकारी कलावंतांनी कलापथक कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या योजनांची माहिती मनोरंजन करुन प्रबोधनातून दिली.
कार्यक्रमाला सरपंच अरुण देशमुख, उपसरपंच चंदन बोलके, सचिव श्रीमती जाधव, निलेश कडू, गौतम बोलके, बाबुलाल भगत, देविदास वानखेडे, श्रीकृष्ण भगत, रोशन सोनवणे, आकाश देवकर, पुंडलिक भगत, हिम्मत भगत, रामदास भगत, सखाराम भगत, सुनिल पंडित, रंजना भगत, रेखा इंगोले, शोभा इंगोले, शारदा भगत, आशा सोनोने, मंदा मोखडकर, मंदा भगत, छाया भगत, वनिता सोनवणे, दिपाली सोनवणे, शांताबाई सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राज्य शासनाने दोन वर्षात केलेल्या कार्याचा गौरवशाली लेखाजोखा मांडण्यात आला. कोरोना आपत्कालीन परिस्थीतीत आपण कसे मदत करु शकलो. आणि जनतेने विश्वासपूर्ण सहाकार्य कसे केले याचे प्रामुख्याने कलापथकाने सादरीकरण केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या धन्यवाद पत्रकातून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जनतेचे मानलेले धन्यवाद विस्तारपूर्वक यावेळी सांगण्यात आले.
कलापथकाच्या सादरीकरणातून ग्रामस्थांना विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना, वसतीगृह योजना, स्व. बाळासाहेब बहुउद्देशिय कृषी संकूल, बालसंगोपन योजना, मिशन वात्सल्य, महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, महाआवास योजना, जलजीवन मिशन योजना, शिवभोजन योजना, कामगार विभागाची योजना, समृध्दी महामार्ग यासह अन्य योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment