जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात हिरकणी कक्षाचे उद्घाटन
जागतिक महिला दिनानिमित्त
वाशिम दि. ०८(जिमाका) जिल्हाधिकारी कार्यालय येथील कक्ष २०२ - बी येथे आज ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी हिरकणी कक्षाची पाहणी करुन आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.या दिवसाचे औचित्य साधून कार्यालयातील महिला कर्मचारी यांना शुभेच्छा देवून संवाद साधला.जिल्हाधिकारी यांनी राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन,जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अलोक अग्रहरी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, सहाय्यक पुरवठा अधिकारी राजेश वजीरे, अधीक्षक राहुल वानखडे तसेच कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत यांनी केले.
Comments
Post a Comment