क्रीडा प्रबोधिनीच्या टॅलेंट सर्चला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ

 

क्रीडा प्रबोधिनीच्या टॅलेंट सर्चला

15 मार्चपर्यंत मुदतवाढ

            वाशिम, दि. 10 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, वाशिम यांच्या संयुक्त वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने क्रीडा संचालनालयाअंतर्गत 11 क्रीडा प्रबोधिनींची स्थापना करण्यात आली आहे. या क्रीडा प्रबोधिनीमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे यासाठी शासनातर्फे कौशल्य प्राप्त खेळाडूंची टॅलेंट सर्च मोहिम राबविली जात आहे. आता या मोहिमेला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या क्रीडा प्रबोधिनीत राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेल्या खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे. क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी सरळ प्रवेश प्रक्रीया व कौशल्य चाचणीअंतर्गत निवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यासाठी शासनाच्यावतीने भरती प्रक्रीया सुरु करण्यात येणार आहे. ज्या खेळाडूंचे वय 19 वर्षाच्या आत आहे. अशा खेळाडूंची या निवासी प्रशिक्षण शिबीरासाठी निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडा प्रबोधिनीच्या ठिकाणी तंत्र शुध्द प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास अद्ययावत क्रीडा सुविधा शासनाच्यावतीने मोफत पुरविल्या जाणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथील राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे व बालाजी शिरसीकर यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे