दुकानाचे नामफलक मराठीत असणे अनिवार्य
दुकानाचे
नामफलक मराठीत असणे अनिवार्य
वाशिम, दि. 24 (जिमाका) : प्रत्येक दुकानाचे नामफलक सुरुवातीला मराठीत नाव असणे अनिवार्य
असेल अशा तरतुदीची महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन अधिनियम,
2017 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
उक्त अधिनियमाच्या कलम
7 अन्वये ज्या आस्थापनेत 10 पेक्षा कमी कामगार आहे. अशा सर्व आस्थापनांना कलम 36 क
(1) कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेत 10 पेक्षा अधिक कामगार आहे
अशा सर्व आस्थापनेचे नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असेल. परंतू अशा
आस्थापनेच्या नियोक्त्याकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषे व्यतिरिक्त इतर
कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील. परंतु आणखी असे की मराठी
भाषेतील अक्षरलेखन नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक असेल आणि मराठी भाषेतील अक्षराचा टंक (FONT) आकार, इतर कोणत्याही भाषेतील
अक्षरांच्या टंक (FONT) आकारापेक्षा लहान असणार नाही. तसेच ज्या आस्थापनांमध्ये
मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशी आस्थापना, नामफलकावर महान व्यक्तींची
किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहिणार नाही. असा बदल शासनाने दिनांक 17 मार्च 2022
रोजी सदर अधिनियमात केला आहे.
जिल्ह्यातील सर्व
आस्थापना मालकांची उक्त तरतुदींचे तंतोतंत पालन करावे. सदर तरतुदीचे भंग करणाऱ्या
आस्थापना मालकांविरुध्द कारवाई करण्यात येईल. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी
गौरव नालिंदे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment