खाजगी क्षेत्रातील नियोक्ते व आस्थापनांकडून रिक्त पदांसाठी 14 मार्चपर्यंत मागणीपत्र मागविले



खाजगी क्षेत्रातील नियोक्ते  व आस्थापनांकडून

रिक्त पदांसाठी 14 मार्चपर्यंत मागणीपत्र मागविले

             वाशिम, दि. 09 (जिमाका) : राज्यातील कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे अद्यापही रोजगाराचा प्रश्न गंभीरच आहे. अशातच जिल्हयातील काही युवक-युवतींचे विविध ठिकाणच्या उद्योग आस्थापनांवरील रोजगार गेलेत, त्यांना आणि इतर रोजगार इच्छुक युवक/युवतींना पुन्हा रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्ट्रीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन मार्च २०२२ च्या दुसऱ्या आठवडयात www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने आयोजीत करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकिय इमारत, वाशिम या कार्यालयाकडून जिल्हयातील नोकरी इच्छुक स्त्री व पुरुष उमेदवारांना रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने जिल्हयातील किंवा जिल्हयाबाहेरील खाजगी क्षेत्रातील नियोक्ते/आस्थापना प्रमुखांना आवाहन करण्यात येत आहे. संबंधीत नियोक्त्यांनी आपल्या आस्थापनांवर आवश्यक असणारे मनुष्यबळ पुर्तीकरीता मागणी पत्र सादर करावे. सदर मागणी पत्रात पदाचे नांव व पदसंख्या, शैक्षणिक/तांत्रिक पात्रता, वयोमर्यादा व मानधन इ. बाबींचा अंतर्भाव करावा. यासाठी ज्या खाजगी आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावयाचे आहे त्यांनी कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. ०७२५२-२३१४९४ यावर संपर्क करुन washimrojgar@gmail.com या ईमेलवर १४ मार्च २०२२ रोजी पूर्वी मागणीपत्र सादर करावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे