जल शक्ती अभियानाच्या रथाचा शुभारंभ
- Get link
- X
- Other Apps
जल शक्ती अभियानाच्या रथाचा शुभारंभ
वाशिम, दि. 29 (जिमाका) : वाढते नागरीकरण आणि हवामान बदलामुळे पाणी साठयावरचा ताण दिवसेंदिवस वाढत असून भूजल पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. यासाठी प्रत्येक व्यक्ती हा जलसाक्षर होणे काळाजी गरज आहे. पाण्याचा विवेकी वापर केला तरच पाणी आपल्याला वाचवेल याच उद्देशातून जलशक्ती अभियान 2022 राबविण्यात येत आहे.
आज 29 मार्च रोजी जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या जल शक्ती अभियान चित्ररथाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी शैलेष हिंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आलोक अग्रहरी, बाल कल्याण समिती सदस्य अरुणा ताजने, ॲड. प्रकाश जोशी, परिवीक्षा अधिकारी गणेश ठाकरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, लेखापाल प्रांजली चिपडे, जलसंधारण कार्यालयाचे श्री. हुमने व अनिल कुरकुटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या रथाच्या माध्यमातून शहरी भागात वृक्ष लागवड, सार्वजनिक इमारती व खाजगी इमारती/घराच्या माध्यमातून जलपुनर्भरण, विहीर पुनर्भरण व शोषखड्डे निर्मित्ती याबाबत जनजागृती करण्यात येणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांचा याबाबतचा संदेश प्रसारीत करण्यात येणार आहे.*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment