जिल्हा जलसंधारण कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली जल शपथ



जिल्हा जलसंधारण कार्यालयात

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली जल शपथ

             वाशिम, दि. 29 (जिमाका) : जलशक्ती अभियान सन 2022 ची सुरुवात करण्यात आली आहे. यानिमित्ताने जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालय येथे आज 29 मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जल शपथ घेतली. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, वाशिमचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री. सपकाळ, मंगरुळपीरचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री. वाघमारे, जलसंधारण अधिकारी श्री. गिरी, तांत्रिक अधिकारी मयुर हुमने तसेच कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

                या जल शपथेमधून पाण्याचा विवेकपर्ण वापर करुन पाणी वाचविण्यात येईल. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा संचय करुन जलशक्ती अभियानामध्ये मनापासून सहभागी होईल. पाणी ही अनमोल संपत्ती आहे असे माणून प्रत्येक जण पाण्याचा वापर करेल. प्रत्येक कुटूंबिय, मित्र आणि शेजाऱ्यांना देखील पाण्याचा विवेकी वापर करण्यासाठी आणि पाणी वाया न घालण्यासाठी प्रेरित करण्याचे काम करण्यात येईल. हा आपला ग्रह असून आपणच त्याला वाचवू शकतो आणि आपले भविष्य सुरक्षित करु शकतो. म्हणून सर्वांनी मिळून जलआंदोलनाला जनआंदोलनाचे स्वरुप देण्याबाबत ही शपथ घेण्यात आली. 

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे