महाडीबीटी पोर्टल : शिष्यवृत्ती व योजनांच्या अर्जासाठी 31 मार्च मुदत
महाडीबीटी
पोर्टल : शिष्यवृत्ती व योजनांच्या अर्जासाठी 31 मार्च मुदत
वाशिम, दि. 25 (जिमाका) : अनुसूचित जाती, विमुक्त जाती
भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग या प्रवर्गासाठी राबविण्यात
येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन
योजनांचे शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील अर्ज स्विकारण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून
नवीन प्रवेशित व नूतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल
कार्यान्वित करण्यात आले आहे.
सन
2021-22 मधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष
मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण
फि, परीक्षा फी व इयत्ता 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांकरीता राजर्षी शाहू
महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in या
महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022
असल्याने महाविद्यालय स्तरावरुन विद्यार्थ्यांना व पालकांना
कळवावे.महाविद्यालयांनी सन 2021-22 करीता अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या
जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे
शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडिबीटी प्रणालीवर जास्त प्रमाणात नोंदणीकृत
होतील याकडे लक्ष द्यावे.
अनुसूचित
जाती,विमुक्त जाती भटक्या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या
प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन 2021-22 या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फि, परीक्षा फि तसेच 11 वी व 12 वीच्या
विद्यार्थ्यांकरीता राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज
परत पाठविण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2022 आहे.याबाबत कार्यवाही करुन पात्र अर्ज
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचे लॉगीनला पाठवावे.ही मुदत अंतिम असून
यानंतर सन 2020-21 या शैक्षणिक सत्राकरीता अर्ज परत कार्यालयास पाठविण्याची
मुदतवाढ होणार नाही. याची जिल्हयातील सर्व शिष्यवृतीधारक विद्यार्थ्यांना या
योजनांचे दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज भरण्यासाठी आपल्यास्तरावरुन कळवावे.
जिल्हयातील
सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी आपल्यास्तरावरुन सर्व संबंधित पात्र
विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर सन 2020-21 या शैक्षणिक सत्रातील अर्ज भरण्यास
अवगत करुन तसेच महाडीबीटी पोर्टल https:/dbtworkflow.mahadbtmahait.gov.in या
संकेतस्थळावर देण्यात आलेल्या विहीत कालावधीत संबंधित महाविद्यालयांनी अनुसूचित
जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या
प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी (फ्रीशिप) योजना व
इतर योजनांच्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करून पात्र
विद्यार्थ्यांचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांच्याकडे तात्काळ
ऑनलाईन पाठवावे. पात्र विद्यार्थी वरील योजनांपासून वंचित राहिल्यास आणि अशा
विद्यार्थ्यांकडून शासन अनुज्ञेय शुल्क वसूल केल्यास संबंधित महाविद्यालय शासन
निर्णयानुसार कारवाईस पात्र राहील. याची नोंद घ्यावी. असे समाज कल्याणचे सहायक
आयुक्त, एम. जी. वाठ यांनी कळविले आहे.
*******
Comments
Post a Comment