मोटार वाहन निरीक्षक यांच्या तालुकानिहाय मासिक शिबीराच्या तारखा जाहीर
वाशिम, दि. ३० (जिमाका) : जिल्ह्यातील मोटार वाहन चालक, मालक यांच्या सोयीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांच्या उपस्थितीत
वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी, तपासणी, वाहन चालक अनुज्ञप्ती कामकाजासाठी मासिक शिबीर आयोजत करण्यात
येते. त्यानुसार जानेवारी ते जून २०२१ या कालावधीत होणाऱ्या मासिक शिबिरांच्या
तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
कारंजा
येथे ५ व २१ जानेवारी, ३ व २३ फेब्रुवारी, ३ व २३ मार्च, ६ व २२ एप्रिल, ४ व २० मे
आणि ४ व २२ जून रोजी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच रिसोड येथे ८
जानेवारी, ९ फेब्रुवारी, ९ मार्च, ९ एप्रिल, ७ मे व ८ जून रोजी, मानोरा येथे १३
जानेवारी, १२ फेब्रुवारी, १५ मार्च, १५ एप्रिल, ११ मे व १४ जून रोजी, मंगरूळपीर
येथे १८ जानेवारी, १६ फेब्रुवारी, १८ मार्च, १९ एप्रिल, १७ मे व १८ जून रोजी मासिक
शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
मासिक
शिबिराच्या दिवशी सुट्टी जाहीर झाल्यास शिबीर दुसऱ्या कार्यालयीन दिवशी घेण्यात
येईल. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत राहील, असे उप
प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञा. ए. हिरडे यांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment