खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी जाहीर
वाशिम, दि. ०२ :
सन २०२०-२१ मधील जिल्ह्यातील प्रमुख खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी २९
ऑक्टोबर रोजी जाहीर झाली असून जिल्ह्यातील प्रमुख पिकांची एकूण सरासरी पैसेवारी ५५
पैसे इतकी आढळून आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
वाशिम
तालुक्यातील १३१ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ६४ पैसे, मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची सुधारित हंगामी
पैसेवारी सरासरी ४७ पैसे, रिसोड तालुक्यातील १०० गावांची सुधारित
हंगामी पैसेवारी सरासरी ४४ पैसे, मंगरूळपीर तालुक्यातील १३७ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ६५ पैसे,
कारंजा तालुक्यातील १६७ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ५४ पैसे
व मानोरा तालुक्यातील १३६ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ५६ पैसे इतकी निश्चित
करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ७९३ गावांपैकी ५७१ गावांची सुधारित हंगामी
पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त आहे, तर २२२ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ५०
पैसे पेक्षा कमी आढळून आली आहे.
*****
Comments
Post a Comment