‘कोविडने काय शिकवले आणि काय करावे’ या विषयवार रविवारी मोफत वेबीनारचे आयोजन
वाशिम, दि. २८ (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी ‘कोविडने काय शिकवले आणि काय करावे’ या विषयावर रविवार, ३० मे रोजी सकाळी ११ ते १२ वा. दरम्यान मोफत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. मनोचिकित्सक डॉ. शीतल देशमुख या सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. तरी इच्छुक युवक, युवतींनी ‘झूम’ अॅपद्वारे या वेबीनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
वेबीनारमध्ये
सहभागी होवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी ‘झूम’ अॅपद्वारे https://us04web.zoom.us/j/7706739074?pwd=bxRmOWowUk1tRCtRNXcrZ1IPaHQzQT09
या लिंकद्वारे किंवा मिटिंग आयडी : ७७० ६७३ ९०७४ आणि पासकोड :
एचपी@१२३ वापरून सत्रात सहभागी होता येईल. यामध्ये काही अडचणी असल्यास ०७२५२-२३१४९४,
९७६४७९४०३७, ९६६५५२५६५१, ८१०८८६८४०३ या क्रमांकावर संपर्क साधून लिंक प्राप्त करून
घ्यावी.
आपल्याकडे झूम ॲप यापूर्वी इन्स्टॉल केलेले नसेल तर इंस्टॉल करुन
घ्यावे. आपण झूम ॲपमधून कनेक्ट झाल्यानंतर आस्क टू जॉईनवर क्लिक करावे. सदर
सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी १० मिनिट वेळेपूर्वी जॉईन करावे. दिलेल्या लिंकमधून
कनेक्ट झाल्यावर लगेच आपला व्हिडीओ व माईक बंद करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न
विचारावयाचे असल्यास माईक अनम्युट सुरु करुन विचारावे व लगेच
माईक म्युट करण्याची दक्षता घ्यावी. प्रश्न विचारतांना मोजक्या
शब्दात विचारावे, असे श्रीमती बजाज यांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment