वाशिम, दि. १९ (जिमाका) : डॉ. सौरभ भुतडा यांच्या वाशिम येथील लाईफ लाईन मल्टीस्पेशालिटी
हॉस्पिटल येथे डेडीकेटेड कोविड रुग्णालय व डॉ. हरीश बाहेती यांच्या माँ गंगा
मेमोरियल बाहेती हॉस्पिटल येथे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरोना
बाधितांसाठी आणखी खाटा उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.
यांनी निर्गमित केले आहेत.
लाईफ लाईन
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे यापूर्वी २५ खाटांच्या डेडीकेटेड कोविड रुग्णालयाला
मंजुरी देण्यात आली होती. या रूग्णालयाच्या दुसऱ्या माळ्यावर २० खाटांचे कोविड
केअर सेंटर सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. या प्रस्तावानुसार कोविड-१९
च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून लाईफ लाईन
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २० खाटांच्या कोविड केअर सेंटरला मंजुरी देण्यात
आली आहे.
माँ गंगा
मेमोरियल बाहेती हॉस्पिटल येथे यापूर्वी ४० खाटांचे डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर
सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली होती. हॉस्पिटलमार्फत आणखी १० वाढीव खाटांना
मंजुरी देण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार कोविड-१९ च्या अनुषंगाने निर्गमित
मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये वाढीव १० खाटांना
मंजुरी देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment