समाज कल्याण विभागाच्या योजनांवरील डिजीटल चित्ररथाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

 

समाज कल्याण विभागाच्या योजनांवरील

डिजीटल चित्ररथाचा जिल्हाधिकारी

यांच्या हस्ते शुभारंभ

          वाशिम, दि. 18 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध महत्वपूर्ण योजनांची माहिती संबंधित घटकातील लाभार्थ्यांना व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने अनुसूचित जाती उपयोजना सन 2021-22 अंतर्गत
तयार केलेल्या डिजीटल चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी 17 जानेवारी रोजी प्रशासकीय इमारत परिसरात चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ आणि जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            डिजीटल चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या महत्वपूर्ण योजनांवर तयार केलेला ‘दिशा परिवर्तनाची’ हा माहितीपट आणि आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व अनुसूचित जातीच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा या योजनांवर आधारित ऑडिओ-व्हिडीओ दाखविण्यात येणार आहे. दिशा परिवर्तनाची या माहितीपटात जिल्हयातील बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचे वाटप, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, रमाई आवास योजना, मुलां-मुलींसाठी वसतीगृह येाजना, अनुसूचित जातीच्या मुलां-मुलींसाठी निवासी शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना व अनुसूचित जाती व नवबौध्‍द घटकांच्या वस्तीचा विकास योजना आदी योजनांवर आधारीत यशोगाथा या माहितीपटातून दाखविण्यात आल्या आहे.

           हा डिजीटल चित्ररथ जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक गावात जाणार असल्यामुळे संबंधित घटकांच्या लाभार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. चित्ररथाचे प्रमोटर संबंधित ग्रामपंचायतीला सन्मार्ग ही माहिती पुस्तिका, विविध योजनांचे भित्तीपत्रके देणार आहे. तसेच चित्ररथावरील माहितीपट व ऑडिओ-व्हिडीओ जिंगल्स बघणाऱ्या नागरीकांना सन्मार्ग पॉम्प्लेट्स वाटप करणार आहे.     

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे