*पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते अभ्यासिकेचे लोकार्पण
*पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते अभ्यासिकेचे लोकार्पण*
वाशिम दि.२६ (जिमाका) वाशिम शहरातील मुला-मुलींना राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी वाशिम नगर परिषदेने जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून जुन्या आययुडीपी कॉलनीतील शिव विद्या मंदिरात तयार केलेल्या सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज २६ जानेवारी रोजी केले. यावेळी आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, नगरपरिषदेचे प्रशासक प्रकाश राऊत व मुख्याधिकारी दीपक मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुसज्ज असलेल्या या अभ्यासिकेची मुलामुलींना बसण्याची क्षमता १२५ इतकी आहे.वातानुकूलित बैठक व्यवस्था १४, सर्वसाधारण बैठक व्यवस्था ११८, एक ग्रंथालय,एक सर्वसामान्य वाचक कक्ष आणि एक वर्ग खोली आहे. ही अभ्यासिका तयार करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून ७६ लक्ष २४ हजार रुपये आणि नगर परिषद निधीतून ५३ लक्ष ८४ हजार रुपये असे एकूण १ कोटी ३० लक्ष ८ हजार ४८७ रुपये खर्च करण्यात आले. सुसज्ज अशा या अभ्यासिकेमुळे वाशिम शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी चांगली सोय झाली आहे.
Comments
Post a Comment