*मुदतीत निधी खर्च करून गुणवत्तापूर्ण कामे करा* पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्हा

*मुदतीत निधी खर्च करून गुणवत्तापूर्ण कामे करा*
             पालकमंत्री शंभूराज देसाई 

जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा 

वाशिम दि.२६ (जिमाका) जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासासाठी नियोजन समितीकडून जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. सर्व संबंधित यंत्रणांनी या निधीतून कामे करताना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतील कामे विहित मुदतीत निधी खर्च करून गुणवत्तापूर्ण करावी.असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. 
            आज २६ जानेवारी रोजी वाकाटक सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजना सन  २०२१-२२ चा आढावा आयोजित सभेत घेताना पालकमंत्री श्री देसाई बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,आमदार एड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक,जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, जि.प अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
              श्री देसाई पुढे म्हणाले, मुदतीत कामे करताना निविदा प्रक्रिया सुद्धा वेळेत झाल्या पाहिजे. सर्व यंत्रणांनी प्रशासकीय मान्यता देखील वेळेत घेतल्या पाहिजे. कामे गुणवत्तापूर्ण झाली आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात येईल. कामाच्या सुरुवातीचे आणि काम पूर्ण झाल्याचे फोटो सादर करावे. जून आणि जुलै महिन्यात प्रशासकीय मान्यता मिळाली पाहिजे. अन्यथा संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल.सन २०२१-२२ या वर्षासाठी १८५ कोटी रुपये निधी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. सर्व निधी हा ३१ मार्च २०२२  पूर्वी खर्च करावा. निधी समर्पित करण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील काही शाळांच्या इमारती ह्या मॉडेल स्वरूपात उभाराव्यात. शाळेचा परिसर रमणीय असावा. असे नियोजन करावे असे त्यांनी सांगितले.     
           श्रीमती आंबरे माहिती देताना म्हणाल्या, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२१-२२ या वर्षासाठी १८५ कोटी रुपये निधी जिल्ह्यासाठी मंजूर आहे. आतापर्यंत विविध यंत्रणांना १३१ कोटी ४३ लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. १०४ कोटी ३२ लक्ष रुपये निधी विविध यंत्रणा देण्यात आला आहे. २४ जानेवारी २०२२ पर्यंत ६६ कोटी ७२ लाख रुपये निधी यंत्रणांनी खर्च केला असून खर्चाची टक्केवारी ६३.९६ टक्के असल्याचे सांगितले. या सभेला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री. वैद्य, कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अविनाश आहेर, जिल्हा जलसंधारण अधिकारी अकोस्कर, शिक्षणाधिकारी रमेश तांगडे व जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्री खंबायत यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे