कन्या समृध्दी योजना लाभ घेण्याचे आवाहन
कन्या समृध्दी
योजना
लाभ घेण्याचे आवाहन
वाशिम, दि. 18
(जिमाका) : भारतीय डाक विभागाच्यावतीने मुलींचे
भविष्य उज्जवल करण्याची संधी देते. पोस्ट विभागामध्ये लहान बचत योजनांची विस्तृत श्रेणी
केली आहे. कन्या समृध्दी योजना ही भारत सरकारची एक छोटी ठेव योजना आहे. जी केवळ
मुलींसाठी आहे आणि ती बेटी बचाओ बेटी पढाओचा एक भाग म्हणून सुरु करण्यात आली आहे. मुलीच्या
शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च भागविण्यासाठी ही योजना आहे. 10 वर्षाखालील मुलींसाठी
किमान 250 रुपयेसह खाते उघडले जाऊ शकते. 17 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत वाशिम
जिल्हयाअंतर्गत येणाऱ्या पोस्ट कार्यालयामध्ये सुकन्या समृध्दी योजनेचे खाते
उघडण्याची विशेष मोहिम राबविली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक सदस्य लाभार्थी ओळखून
आणि जवळच्या पोस्ट कार्यालयामध्ये एसएसवाय खाते उघडून 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या
मुलींसाठी 250 रुपये योगदान देऊ शकतात. तसेच एसएसवाय खाते उघडल्यानंतर आपण
आयपीपीबी खात्यामार्फत आपले पुढील भरणा ऑनलाईन पध्दतीने भरु शकता. फक्त 250 योगदान
दया आणि मुलींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दिवा लावा.
तरी जिल्हयातील सर्व नागरीकांना मुलीच्या उज्जवल
भविष्यासाठी आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयामध्ये सुकन्या समृध्दी योजनेचे खाते
फक्त 250 रुपयात उघडण्यात येत असल्याचे आवाहन डाक विभाग वाशिमचे उपविभागीय अधिकारी
यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment