राज्य व जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावी
राज्य व
जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजना
निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावी
वाशिम, दि. 12 (जिमाका) : नाविन्यपुर्ण
राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत दुधाळ गाई- म्हशीचे गट
वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी
निवारा शेड उभारणीस अर्थ सहाय्य देणे या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड
प्रक्रीया सन 2021-22 या वर्षात राबविण्यत येत आहे. ज्या लाभार्थ्यांची या योजनेअंतर्गत
निवड करण्यात आली आहे. अशा प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांसह या लाभार्थ्यांनी 12
ते 16 जानेवारी 2022 दरम्यान पशुसंवर्धन विभागाच्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीच्या
httsp://ah.mahabms.com या संकेतस्थळावर अँड्रॉईड मोबाईलमध्ये गुगल प्ले
स्टोअरमध्ये जाऊन AH-MAHABMS (Google Play Store) या अप्लीकेशनची निवड करावी. 16
जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. ऑनलाईन पध्दतीने
लाभार्थी निवड यादी पंचायत समितीस्तरावर पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे
लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.
वानखेडे यांनी कळविले आहे.
*******
Comments
Post a Comment