आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ऑनलाईन वेबीनार

 

आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त

ऑनलाईन वेबीनार

           वाशिम, दि. 11 (जिमाका) : युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमच्यावतीने 12 जानेवारी रोजी दुपारी 1 ते  2 या वेळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन या विषयावर तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय वाशिमचे प्रभारी प्राचार्य व समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पद्मानंद तायडे आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज हया ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे. तरी इच्छुक युवक/युवतींनी या वेबिनारचा लाभ घ्यावा. या वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी https://meet.goole.com/tbb-kgjg-fau या लिंकवर क्लिक करुन सत्रास सहभागी व्हावे. आपल्याकडे गुगल मिट ॲप यापूर्वी इन्सटॉल केलेला नसेल तर इन्सटॉल करुन घ्यावा. गुगल मिट ॲपमधून कनेक्‍ट झाल्यानंतर वरील लिंकवर जॉईन व्हावे. सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनीटे वेळेपूर्वी जॉईन व्हावे. दिलेल्या लिंकवर जॉईन झाल्यावर लगेच आपला व्हिडीओ व माईक बंद करावे. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक सुरु करुन विचारावे व लगेक माईक बंद करावा. प्रश्न विचारताना मोजक्या शब्दात विचारावे. काही अडचणी असल्यास 07252-231494 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश