कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येचांगल्या सुविधा निर्माण करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये
चांगल्या सुविधा निर्माण करा
-         पालकमंत्री शंभूराज देसाई
 
वाशिम, दि. 27 (जिमाका) : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ग्रामीण भागातून शेतकरी बांधव तसेच नागरीक मोठ्या प्रमाणात कामानिमित्त येत असतात. शेतकरी, हमाल, मापारी व नागरीकांची  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरसोय होणार याची काळजी घेऊन चांगल्या सुविधा निर्माण कराव्यात. असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम येथे 26 जानेवारी रोजी  स्व.बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुल आणि स्व.खा.पुंडलीकराव गवळी व्यापारी संकुलाचे लोकार्पण पालकमंत्री श्री.देसाई यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अमित झनक, जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, व मुख्य प्रशासक रेखा मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. देसाई पुढे म्हणाले, स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी वाशिम जिल्हा निर्माण करीत असतांना सांगितले होते तालुका हे नांव बाजुला करा आणि जिल्हा लिहा. ही किमया फक्त स्व. बाळासाहेब ठाकरे करु शकले. त्यांनी एखादी गोष्ट मनात आणली की ही गोष्ट करायची,कितीही अडचणी आल्या तर ती गोष्ट  शेवटाला नेवून पूर्ण करायचे. स्व. बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुल आणि स्व.खा. पुंडलीकराव गवळी व्यापारी संकुल ही दोन नावे या व्यापारी संकुलास दिल्याचे आपल्यास आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.या दोन्ही व्यक्तींचे वाशिम जिल्हा निर्मितीत महत्वाचे योगदान असल्याचे श्री. देसाई म्हणाले.
श्री. देसाई बोलतांना पुढे म्हणाले, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 250 गाळे आहे. आणखी काही गाळे इथे तयार करता येतात. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न वाढले पाहिजे. यासाठी नियोजन करावे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची मागणी केल्यास निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. असे त्यांनी सांगितले.यावेळी सुरेश मापारी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक अनिल गोटे, जनार्धन भोयर यांचेसह प्रशासक,तसेच शेतकरी व व्यापारी बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे