महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज भरण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदत

 

महाडिबीटी पोर्टलवर

शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज भरण्यास

31 जानेवारीपर्यंत मुदत

         वाशिम, दि. 12 (जिमाका) : विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती/ शिक्षण फी, परीक्षा फी, योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांचे शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील अर्ज स्विकारण्यासाठी महाडिबीटी पोर्टल 14 डिसेंबर 2021 पासुन नविन प्रवेशित व नुतनीकरणाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी कार्यान्वीत करण्यात आले आहे.

             सन 2021-22 मधील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडिबीटी पोर्टलच्या https://mahadbtmahait.govin या संकेतस्थळावर भरुन घ्यावे. महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांना सन 2021-22 सत्रातील महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज भरण्याची अंतीम मुदत 31 जानेवारी 2022 आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावरुन अवगत करण्यात यावे. महाविद्यालयांनी सन 2021-22 करीता अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडिबीटी प्रणालीवर जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणीकृत होतील याकडे महाविद्यालयांनी लक्ष दयावे. सन 2020-21 या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्ती अर्ज परत पाठविण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2022 आहे. तरी महाविद्यालयांनी ही कार्यवाही करुन पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त, वाशिम यांचे लॉगीनला पाठवावे. जिल्हयातील सर्व प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना वरील योजनांचे दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज भरण्यासाठी आपल्यास्तरावरुन कळवावे.

           पात्र विद्यार्थ्यांना महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कळवून तसेच महाडिबीटी पोर्टलच्या https://mahadbtmahait.govin या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या कालावधीनुसार संबंधित महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती/ शिक्षण फी, परीक्षा फी (फ्रिशीप) योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करुन पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण वाशिम यांच्याकडे तात्काळ पाठवावे. पात्र विद्यार्थी वरील योजनांपासून वंचित राहिल्यास आणि अशा विद्यार्थ्यांकडून शासन अनुज्ञेय शुल्क वसुल केल्यास संबंधित महाविद्यालय कारवाईस पात्र राहील. असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, मारोती वाठ यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे