तहसिल कार्यालय रिसोड येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

तहसिल कार्यालय रिसोड येथे 
राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
वाशिम, दि.25(जिमाका) नागरिकांमध्ये मतदानाविषयी व नवमतदार यांची नोंदणी करणे याबाबत जास्तीत जास्त लोकांना आपला मतदानाचा अधिकार बजावता यावा याबाबत जागृती होण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो.आज 25 जानेवारी रोजी तहसिल कार्यालय रिसोड येथे 12 वा राष्ट्रीय मतदार दिवस कोरोनाच्या नियमांचे पालन करुन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला." सर्वसमावेशक सुलभ आणि सहभागपुर्ण निवडणुका " अशी यावर्षीच्या मतदार दिनाची मध्यवर्ती संकल्पना होती, त्याअनुषंगाने रिसोड येथील स्व.पुष्यादेवी पाटील कला व विज्ञान महाविदयालय व उत्तमचंद बगडीया महाविदयालयात निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, व्हिडीओ तयार करणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
आज या स्पर्धेतील विजेत्यांना तहसिलदार अजित शेलार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी / अधिकारी यांनी मतदार दिनानिमित्त कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु अशी शपथ घेतली.अध्यक्षस्थानी तहसिलदार अजित शेलार होते. प्रास्ताविक प्रा.अतुल खोटे यांनी केले. सुत्रसंचालन संतोष बोडखे यांनी तर आभार निवासी नायब तहसिलदार लक्ष्मण बन्सोडे यांनी मानले. कार्यक्रमात स्पर्धेतील सहभागी स्पर्धक, परिविक्षाधिन उपजिल्हाधिकारी श्री. काळबांडे,परिविक्षाधिन तहसिलदार श्री. क्षिरसागर, निवडणुक नायब तहसिलदार प्रविण लटके, परिविक्षाधिन नायब तहसिलदार श्री.कावरे,महसुल सहाय्यक संदिप काळबांडे, प्रा.वानखेडे,प्रा.भोयर व तहसिल कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे