शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 22 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित


शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
22 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

वाशिम,दि. 05 (जिमाका) सर्वोत्कृष्ट क्रीडापटू व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाच्या प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावलीनुसार सन 2022-23 या वर्षाच्या पुरस्कारसाठी 8 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. पुरस्काराकरीता राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक,खेळाडू,साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडूनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://soprts.maharastra.gov.in या संकेतस्थळावरील स्क्रॉलिंग लिंक (Scorling Link) मध्ये उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर 8 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत रात्री 12 वाजतापर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करावे.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.
                      ***

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे