सर्वांच्या सहकार्यातून जिल्हयाचा विकास करुया जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

सर्वांच्या सहकार्यातून जिल्हयाचा विकास करुया

                              जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

पोलीस कवायत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

वाशिम, दि. २६ (जिमाका) : जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी यंत्रणा सुक्ष्म नियोजनातून काम करीत आहे.  शासनाच्या विविध योजनांची, उपक्रमांची आणि अभियानांची जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. लोक प्रतिनिधींचे यासाठी सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करुया असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.

आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे व अपर पोलीस अधिक्षक भारत तांगडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, महाराष्ट्राच्या आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने शिवाजी महाराजांच्या जीवन प्रसंगावर आधारीत महानाटय आणि महाराष्ट्राच्या समृध्द संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील बॅरेजच्या १७३ कोटी रुपयांच्या कामास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे १३४५ हेक्टर जमीन तसेच २ बॅरेजला देखील नुकतीच मान्यता दिली आहे. यामुळे २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येणार आहे. जमीन मोजणीची कामे अचूक व जलद गतीने होण्यासाठी भूमिअभिलेख विभागाला ३१ रोव्हर्स मशिन आणि ७० लॅपटॉप उपलब्ध करुन देण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहिद पोलीस स्मृतीस्तंभाला मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना दिली. त्यानंतर श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी परेडचे निरीक्षण केले. वाशिम पोलीस दलाचे पुरुष व महिला पथक, होमगार्ड पुरुष व महिला दल, बाकलीवाल विद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेनेचे पथक, सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळेचे विद्यार्थी, नवोदय विद्यालयाचे स्काऊट पथक, सुरकंडी येथील मुलींचे निवासी शाळेचे पथक, महात्मा गांधी नगर परिषद शाळेचे पथक, पोलीस बँण्ड पथक, शिघ्र कृती दल, पोलीस श्वान पथक, पोलीस बॉम्ब शोधक पथक, पोलीस मोबाईल फॉरेन्सीक इनव्हेस्टीगेशन व्हॅन, पोलीस वॉटर कॅनॉन, शासकीय रुग्णालयाची अत्याधुनिक रुग्णवाहिका व नगरपरिषदेचे अग्निशमन  दलाचे वाहन आदी परेडमध्ये सहभागी झाले होते. यावेळी विविध पथकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

           जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांच्या हस्ते वीर पत्नी शांताबाई यशवंत सरकटे व पार्वतीबाई दगडू लहाने, वीरमाता मंदाताई गोरे, वीरपीता तानाजी गोरे व वीर पत्नी वैशाली गोरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. महीला आर्थिक विकास महामंडळाचे दिव्यांग समावेशन कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांग समावेशन सुलभकर्ता म्हणून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या श्रीमती राधिका भोयर व दत्तात्रय राठोड, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे जिल्हास्तरीय सादरीकरणात तज्ञ ज्युरो समितीकडून ४ नवउद्योगजकांची निवड झालेल्या स्टार्टअप अथर्व म्हातारमारे, ज्ञानेश्वर कापसे, सेहरगुल पठाण व शिवहरी नेमाडे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा विश्वकर्मा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार २०२१-२२ अंतर्गत प्रशांत भगत, सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षातील जिल्हा युवा पुरस्कार वितरण पंकज राताहोड, सोनल तायडे, महात्मा ज्योतिबा फुले कला शिक्षण व आरोग्य बहुउद्देशीय संस्था उमरा (शमश्योद्दीन), प्रदीप पट्टेबहादूर, अल्टरनेटिव्ह मेडिसिन डॉक्टर्स असोसिएशन संस्था, पाचंबा, निखिल चव्हाण, कु. दिव्या जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था तोंडगाव व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्हा रुग्णालय व कानडे बाल रुग्णालय यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, श्री. व्यवहारे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अनिल कावरखे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक अभिनव बालुरे, माविमचे विभागीय सनियंत्रण अधिकारी केशव पवार, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, मुख्याधिकारी निलेश गायकवाड, तहसीलदार निलेश पळसकर, शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, गजानन डाबेराव, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे, अधीक्षक राहुल वानखडे,  आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, तसेच विविध कार्यालयाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

          कार्यक्रमाचे संचालन राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयाचे शिक्षक मोहन शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव, नागरिक व विविध शाळेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे