शेगांव येथे २ फेब्रुवारीला विभागीय रोजगार मेळावा


*शेगांव येथे २ फेब्रुवारीला विभागीय रोजगार मेळावा*

वाशिम,दि.३१ (जिमाका) जिल्हयातील नोकरी/ रोजगार इच्छूक उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात,या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय,अमरावती, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती व श्री.संत गजानन महाराज अभियांत्रीकी महाविद्यालय,शेगांव यांच्या संयुक्त वतीने २ फेब्रुवारी रोजी श्री.संत गजानन महाराज अभियांत्रीकी महाविद्यालय,शेगांव येथे विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या विभागीय रोजगार मेळाव्यात पिपल ट्री व्हेन्चर्स प्रा.लि.अमरावती, जिनीअस इंन्फ्रा प्रा.लि.,धुत ट्रॉन्समिशन प्रा.लि.छत्रपती संभाजीनगर,ए.जी.एस.इंशुरन्स, अमरावती,पियाजिओ व्हेवीकल्स प्रा. लि.,परम स्कील्स ट्रेनींग (इं) प्रा. लि. छत्रपती संभाजीनगर,लक्ष्मी अग्णी कंपनी प्रा.लि.,जाधव ग्रुप ऑफ कंपनी,सहयोग मल्टीस्टेट क्रेडीट सो. लि.,नवभारत फर्टीलायझर,टॅलेनसेतू प्रा.लि.,सी.ए.जी.एल.,कल्पतरु स्कील डेव्हलपमेंट अॅकेडमी, इलेगन्ट कोटींग प्रा.लि.,संत
तेजस्वी फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रा. लि.,पी.एन.बी.मेटलाईफ इंडीया इंशुरन्स प्रा.लि.,पियाजिओ व्हेविकल्स प्रा.लि.बारामती,अलाईड रिसोर्स मॅनेजमेंट सव्हिस प्रा. लि. पुणे,परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रा. लि.छत्रपती संभाजीनगर,होन्डा मोटर्स एल.एस.पी.आणि इलेगन्ट कोटींग प्रा.लि.आदी नामांकीत कंपनी/ उद्योगाकडील उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी विभागीय रोजगार मेळाव्यात प्रत्यक्षपणे उपस्थित राहून नोकरी इच्छूक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून निवड प्रक्रिया पूर्ण करणार आहे.यासाठी किमान इयत्ता ५ वी ते इयत्ता १२ वी,आय.टी.आय. (सर्व ट्रेडस्), पदवीधर (कला/वाणिज्य/विज्ञान), पदव्युत्तर पदवी (सर्व शाखा),अभियांत्रिकी पदविधर व पदविकाधारक इ.शैक्षणीक तसेच तांत्रिक पात्रता असणारे वयोमर्यादा १८ ते ४५ मधील युवक-युवतींना १२०० पेक्षा जास्त रिक्तपदांकरीता रोजगार मिळविण्याची संधी प्राप्त होणार आहे.
          तरी जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्षपणे उपस्थित राहून मुलाखत दयावी.या विभागीय रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी त्यांचेकडील सेवायोजन कार्डच्या युझरनेम व पासवर्डमधुन मेळाव्यात सहभागी होता येईल. 
        रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होण्यासाठी आपणाकडे एम्पॉयमेंट कार्डमधील युझरनेम व पासवर्ड असावे.नसल्यास www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Job Seeker वरील Register वरुन युझरनेम व पासवर्ड मिळवावा. त्यानंतर Job Seeker च्या विंडोमध्ये लॉगीन करुन डाव्या बाजुकडील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करावे.येथे आपणांस Washim जिल्हा निवडुन त्यातील आपल्या पात्रतेनुसारच्या पदांवर अप्लाय करावे.त्यावेळी Successfully Applied for the Job असा msg दिसेल.तसेच या विभागीय रोजगार मेळाव्यास ऑनलाईन पध्दतीने https://shorturl.at/ADIW9 या लिंकवरुन सुध्दा सहभागी होता येईल.असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्र, वाशिमच्या वतीने कळविण्यात आले आहे.
                  *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे