35 वा रस्ता सुरक्षा अभियान : हेल्मेट रॅली उत्साहात
- Get link
- X
- Other Apps
35 वा रस्ता सुरक्षा अभियान
हेल्मेट रॅली उत्साहात
वाशिम, दि. 18 (जिमाका) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिमच्या वतीने जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षेविषयी नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी. याकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. मोटार सायकल वाहन चालकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती व्हावी, याकरीता आज 18 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजता परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महिला वर्ग, मोटार ड्रायव्हिंग स्कुल, पी.यु.सी. केंद्र, वाहन विक्रेत्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेवून शहारामध्ये मोटार सायकल रॅलीचे आयोजन केले. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली. त्यानंतर ही रॅली पोलीस स्टेशन चौक, आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका व जिल्हा सामान्य रुग्णालय येथून उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात पोहोचून येथे रॅलीची सांगता करण्यात आली.
रॅलीमध्ये सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरिन सय्यद, मोटार वाहन निरीक्षक एस. आर. पगार, एस. ए. सोयगांवकर, एस. जी. पल्लेवाड, व्ही. बी. घनवट, डी. पी. सुरडकर, सहायक मोटार वाहन निरीक्षक एस. पी. सरागे, एस. बी. इंगळे, एम. आर. टवलारकर, जे. डी. काटे, अताउल्लाखान पठान व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी सहभागी होते.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment