विशाल हृदयाची ,दयाळू बाई म्हणजेच सावित्रीबाई फुले



विशाल हृदयाची ,दयाळू बाई
 म्हणजेच सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पुस्तक वाचले त्यामधूनच थोडे  लिहण्याचा प्रयत्न केला व व्हाट्सअप मध्ये बोलून टाईप केले आणि वाचनास दिले. चुकी असल्यास क्षमस्व.. 

महाराष्ट्रावर असलेल्या तुर्क मोगलांच्या परकीय आणि जुलमी राजवटी विरोधात मावळ्यांची फौज उभारून माॅजिजाऊच्या संस्कारात वाढलेल्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. खऱ्या अर्थाने कष्टकरी जनतेचे ,रयतेची मायेच्या प्रेमाने काळजी घेणारे ,स्त्रियांच्या योग्य मान सन्मानराखणारे, स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यास कठोर, लगेच शिक्षा देणारे राज्य निर्माण केले ,माणसांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळून दिले .लोकांची त्याकाळी भावना होती की ,या राज्यात प्रजा सुखी आणि समाधानी आहे. कुणावरही अन्याय ,बळजबरी नाही .असंच राज्य आजही तुम्हा आम्हाला हवे आहे ,कार्ल मार्क्स जर्मन विचारवंताच्या मते' *इतिहास हा वर्तुळाकार गतीने पुढे जात असतो काही वेळा तो पुढे जाण्यासाठी थोडा मागे येऊन पुन्हा पुढे जातो' .* महाराष्ट्रात शिवशाहीनंतर पेशवाई आली हे पेशवाई एवढी स्त्रीविरोधी व अत्याचारी होती की ,गावात पेशव्यांची स्वारी येणार असे समजताच मायबाप आपल्या मुली -सुनांना धान्याच्या कणगीत लपवून ठेवत तर काही आपल्या अब्रू रक्षणासाठी विहिरीत उड्या मारून स्वतःला संपवत होते ,पुढे 1818 साली पेशवाई बुडाली .परंतु विषमतेमुळे ,वर्णभेदामुळे काही पुरुष जातीतील व सर्व स्त्रियांना शिक्षण, ज्ञान घेण्याचा व संपत्ती संचयाचा अधिकार नव्हता. स्त्री शिकलेस तर महिला विधवा होतील ,ताटात अळया पडतील. स्त्रिया कुमार्गास  लागतील अनेक गैरसमज भीती निर्माण केल्यात .आज आपण पाहतो की स्त्री शिकल्यामुळे काय घडले .संपूर्ण कुटुंबाची ,गावाची ,देशाची शान वाढली. निर्णय घेण्याचा अधिकार स्त्रियांना नव्हताच म्हणूनच सात आठ वर्षाच्या मुलीची लग्न म्हाताऱ्यां व्यक्तीशी ,रोग्याची लावून देऊ लग्नाच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचे, स्त्री जन्म म्हणजे पाप समजायचे, पायात चपला घालण्यास परवानगी नव्हती ,पुरुषापेक्षा बाई खालच्या दर्जाची आहे  हे स्त्रियांच्या मनावर लहानपणापासून बिंबवल्या जात होते म्हणून आजही स्त्री लिंगभेदभावामुळे निर्णय घेण्यास धाडस करीत नाही, आपल्या मनासारखं जगू शकत नाही .केलेच धाडस तर आधी घरदार मुले ,संसार  पाहुणे सांभाळणे नंतर नोकरी ,व्यवसाय .एवढेच काय आजही प्राधान्य मुलास दिले जाते मग शिक्षण असो की लग्न नोकरी असो .त्याकाळी सती प्रथा होती दरवर्षी हजारो स्त्रिया सती गेले 1839 मध्ये इंग्रजांनी या प्रथेवर बंदी घातली त्यानंतर विधवा स्त्रियांच्या वाटेला जे आयुष्य ,अहवेलना आली ते पाहता  मेलेले बरे असे स्त्रियांना वाटे .इंग्रजांनी जेव्हा स्त्रियांना ,अशिक्षित पुरुषांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना मदत करण्याची भूमिका घेतली ,तेव्हा त्यांना त्यावेळी काहींनी धार्मिक बाबतीत इंग्रजांनी लक्ष घालू नये म्हणून प्रयत्न ,कटकट केली आणि इंग्रजांनी माघार घेतली अशा कर्मठ ,धार्मिक ,सामाजिक व राजकीय वातावरणात 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाईचा जन्म खंडूजी निवासे पाटील या माळी कुटुंबात झाला. सुंदर ,देखणी, निरोगी सावित्री होती, स्त्री शिक्षणावर बंदीच असल्यामुळे शाळेत जाण्याचा प्रश्न नव्हता. लहानपणापासूनच सावित्री शेतात काम करणे, गुरे सांभाळणे ,गाई ,म्हशीच्या धारा काढणे हे कामे मोठ्या आनंदाने मनापासून करी .नवनवीन शिकणे समजून घेणे तिला आवडे .वयाच्या नवव्या वर्षी 1840 मध्ये ज्योतिबा फुले यांचेशी विवाह झाला. गोविंदराव ज्योतीराव, सगुणाबाई व सावित्री सोबत राहत होते .फुलांचा व्यवसाय होता .ज्योतिबा गावातील मशिनरी शाळेत शिकत होते,सगुणाबाई  ज्योतिबास म्हणाल्या तु जे शाळेत शिकते ते सावित्रीला घरी शिकव म्हणून .सावित्रीने लगेच सगुनाबाई व स्वतः सावित्रीबाई  दोघीलापण शिकवण्यास सुचविले .आणि जोतिबाची पहिली बायांची शाळा झाडाच्या सावलीत ,धरतीची पाटी  आणि झाडाच्या काड्यांची लेखणी सुरू झाली .सावित्रीने काव्यात लिहिले .

 करी ज्योती शेती घडे लग्न त्याचे
घेई इंग्रजीचे धडे छान वाचे
 मला आऊला पाठ देई शिकाया
असामान्यतेचा बरी भव्य पाया

दोघीला शिकवून ज्योतिबा भविष्यात करावयाच्या सामाजिक कामाच्या मजबूत पायाभरणीची काम करीत होते .सावित्रीला प्राथमिक शिक्षण घरीच ज्योतिबांनी दिले नंतर अहमदनगर येथे फरार बाईच्या शाळेत व पुढे पुण्यात मीचेल बाईच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाची प्रशिक्षणघेतलले 1847 मध्ये शाळा सुरू केली चार महिन्यात ते बंद पडली ज्योतिबा बेचैन झाले पुण्यात दवंडी देऊन सभा घेतली .या सभेनेच पुढे महाराष्ट्राच्या शिक्षणाचा इतिहास बदलला .ज्योतिबा बोलताना म्हणाले, स्त्रियांच्या सर्व दुःखाची मुळे कोणती असतील तर *पितृसत्ताक पद्धती* हे आहे आजही पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रिया मागेच आहेत. या सभेत मुलीसाठी शाळा काढण्याचा मनोदय जाहीर केला .भिडे मित्राच्या साहय्याने भारतातील पहिली मुलींची शाळा 1 जानेवारी 1848 रोजी फुले दांपत्यांनी सुरू केली. 1848 वर्ष क्रांतिकारक होते .लपून छपून मुली शाळेत येत होते लोकभयामुळे. काही शाळा बंद पडले तरी काम शिक्षणाचे नियमीत सुरू होते. अनेक पुरुष कार्यकर्ते त्या काळात सार्वजनिक कार्यात सक्रिय होते ,पण *सावित्रीबाई ही सार्वजनिक कार्यासाठी घराबाहेर पडणारी पहिली भारतीय स्त्री होती* आज स्त्रिया उच्च पदावर, उच्च क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटलेला दिसतो त्याचा पाया घालण्याचे काम सावित्रीने केले,सावित्रीला तेव्हा त्यांच्या मैत्रिणींनी त्यांचा छळ पावत नसल्यामुळे सुचविले की, ज्योतिबा पुरुष आहे त्यांना ते काम करू दे, तु मात्र मुलीच्या शाळेतील शिकवणे बंद कर .सावित्रीने उत्तर दिले .त्यांना कळत नाही ते अज्ञानी आहेत. त्यांना सत्य कळावे म्हणून मी विद्यादानाचे काम करते , *ज्यांचे अज्ञान दूर करत होते तेच लोक त्यांना त्रास द्यायची* कितीही त्रास झाला संकटे आली तरी *अज्ञान नावाच्या आपल्या शत्रूला हकलायचेच असा निर्धार सावित्रीबाईंनी* केला .भारतातील पहिली मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा शेख यांना   सावित्रीबाईंनी प्रशिक्षित करुन  भारतातील पहिली मुस्लिम समाजातील शिक्षीका तयार केले,त्यांनीही शिकवण्याचे काम केले, 1848 ते 1852 या चार वर्षात 18 शाळा सुरू केल्या. सावित्रीबाई म्हणतात,

 विद्याधन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून
 तिचा साठा जयपाशी ज्ञानी तो मानती जन

 सत्कार समारंभात ज्योतिबाच्या गळ्यात पडलेला पुष्पहार ज्योतिबांनी आपल्या गळ्यातून काढून सावित्रीच्या गळयात घातला आणि ते समारंभात म्हणाले, शिक्षण कार्याविषयी माझे जे कौतुक झाले ते माझे नसून तुमची आहे. त्याचे खरे श्रेय तुम्हालाच मिळायला हवे. असे म्हणणारे ज्योतिबा महान मोठ्या मनाचे पुरुष होते पत्नीच्या सेवेची कार्याची जाणीव त्यांना होती. 1863 साली वाईट घटना घडली, विधवा काशीबाईला एकाची फसवले ती गरोदर झाले, मायबोली तीने जन्मलेल्या बाळाची हत्या केली ,तिला काळ्यापाण्याची शिक्षा झाली .हे पाहून सावित्री हळहळले. बाल हत्या रोखण्यासाठी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केले .मुलीची कमी वयात जास्त वयाच्या माणसाशी लग्न होत होती .त्यामुळे तेव्हा विधवा महिलांचे प्रमाण जास्त होते त्यांचे जीवन हे वेदनादायी होते ,विधवा आत्महत्या जास्त होत होते म्हणून आश्रम राहत्या घरात सावित्रीने सुरू केला,आश्रमात येणाऱ्या विधवांची सावित्री स्वतः बाळंत करी ,स्वतःच सावित्रीला मुलं नव्हते  तरीही अनेक मुलींची आई होऊन त्यांची मुले जोतिबा सावित्रीने सांभाळत होते, विधवा पुनर्विवाह प्रयत्न करण्यासाठी *विधवा विवाहसभा* सावित्रीनी 8 मार्च 1860 रोजी घेतली. न्यायमूर्ती रानडे यांचे मृत्यूनंतर रमाबाई रानडे यांनी केशवपण करण्यास नकार दिल्यामुळे त्यांचे घरातील महिलांनी त्यांना वाळीत टाकले ,एकटे सोडले ,समाज सुधारकांच्या पत्नीचे हे हाल असतील तर इतर स्त्रियांची काय स्थिती? सावित्रीने भन्नाट कल्पना काढली महिलांचे विद्रूपीकरण व महिलांवर अत्याचार कसा होतो हे सावित्रींनी नाभिकांना सांगितले. आणि नाव्हिकांनी केशवपन  विरोधात संप केला .केशवपणाची प्रथा बंद झाली. 
त्याकाळी सार्वजनिक विहीरीवर ,तळ्यावर ,पानवठावर पाणी भरण्यास सर्वांना मुभा नव्हती तेव्हा सर्वांसाठी सावित्री ज्योतिबांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद पाणी भरण्यासाठी सर्वांसाठी खुला केला .हाताने पाणी घेऊ लागले जणू काही *शतकानूशतकांची वाईट रूढी हौदात बुडून टाकली.* त्यामुळे पुन्हा सावित्री ज्योतिबाच्या विरोधात लाट उसळली,
 सावित्री म्हणतात दारू, भांग ,बाकीचे व्यसनामुळे मनुष्याची आतडी नासते, व्यसनी माणूस फार दिवस जगत नाही ,मनुष्याचे बुध्दी भ्रष्ट ,माणुसकी नष्ट होते व्यसनात मी कोण ?योग्यता काय? विसरतो .लोकंही अशांची टिंगल, चेष्टा करतात , पैशाची हानी आणि संसाराची परवड होऊन व्यसनी लोक लवकरच धुळीस मिळतात, आज तर व्यसन म्हणजे फॅशन झाले , आरोग्याची, कुटुंबाची चिंता नाही .त्याकाळी दारूची  व्यसन इतके अक्राळविक्राळ  स्वरूपात नसले तरी काही कुटुंबात व्यसनाचे कीड लागली होती, फुले दांपत्यांनी 
1880 च्या दरम्यान सरकार दारूचे दुकान वाढवण्याचा विचार करू लागले तेव्हा त्यांना विरोध केला होता. पुणे नगरपालिकेला परवानगी देऊ नये म्हणून पत्र लिहिले होते .
1877 मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला ,लाखो लोकांचा बळी गेला त्यावेळी सावित्रीबाई गावोगावी फिरून निधी जमवत होते व्हिक्टोरिया बाल आश्रम नावाने अन्नक्षेत्र तसेच ठिकठिकाणी अन्न छत्र सुरू केले, सावित्रीबाई ही विशाल हृदयाची दयाळू बाई होते  1896 साली पुन्हा दुष्काळ पडला त्यावेळी महात्मा फुले हयात नव्हते .
24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली .

सत्य सर्वांचे आदी घर .
सर्वधर्माचे माहेर 
जगामाजी सुखसारे
 खास सत्याची ती पोरे
 सत्य आहे ज्यांची मुळ
 करी धुर्तांची पालन बाराळ बळसत्याचे पाहून 
बहुरूपी जळे मनी

4 फेब्रुवारी 1889 रोजी सावित्री ज्योतिबांनी दत्तक मुलगा यशवंत याचा सत्यशोधक पद्धतीने मराठा समाजातील राधाबाईशी विवाह केला, हा आंतरजातीय पहिला विवाह असावा. सावित्रीने सुनेचे शिक्षणही लग्नाआधि करून घेतले ,आजही एवढी मोकळीक नाही तेव्हा सावित्रीने सुनेला लग्न आधी  घरी आणुन शिकवले ,आंतरजातीय विवाहास आजही पाहिजे तशी मान्यता नाही ,विचीत्र परिस्थिती निर्माण  होते काहींची, 
28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांचे महानिर्वाण झाले त्यांची अंत्ययात्रेवेळी टिटवे कोणी धरायचे प्रश्न होता. ज्योतिबांनी मृत्युपत्र लिहून ठेवले होते यशवंत हाच अग्नी संस्कार करेल आणि तोच वारसदार असेल , नातेवाईकांनी त्यास विरोध केला दुःखात सावित्रीबाई डगमगले नाही तर त्यांनी पुढे येवून *धैर्याने टिटवे हातात घेतले. स्वतः पतीच्या पार्थीवास अग्नी दिला ,भारताच्या इतिहासात ही घटना पहिली असेल .* 

1893 मध्ये सत्यशोधक समाजाच्या विसाव्या परिषदेच्या सावित्रीबाई अध्यक्ष होते . *सावित्रीबाई या शिक्षिका ,माता ,कार्यकर्त्या स्त्रीमुक्ती चळवळीच्या अग्रणी या विविध रूपांमध्ये दिसतात .यासोबतच कवयित्री साहित्यिक विचारवंत कृतीशील व्यक्तिमत्त्व विविध पैलू आणि प्रतिभांचा संगम आहे* 
1896 च्या दुष्काळा पाठोपाठ 1897 साली पुणे परिसरात प्लेगची साथ पसरली. शेकडो माणसे या आजाराने मरू लागली. सावित्रीबाईच्या नेतृत्वात प्लेगविरोधी अभियान सुरू झाले, लष्करात नोकरीला असलेला यशवंतास रजा घोरपडी परिसरात पुढे परिसरात तात्परता दवाखाना टाकण्यासाठीसुचविले यशवंत व सावित्रीबाई जीवघेण्या आजाराच्या साथी विरोधात राबराब राबत होते ,पण प्लेगची साथ कमी होईना ,पांडुरंग गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाली ही बातमी कळताच सावित्रीबाई त्याच्याकडे वाऱ्याच्या वेगासारख्या धावल्या ,त्याला पाठीवर घेवुन धावपळ दवाखान्यात आणले आणि त्याचवेळी सावित्रीबाईस प्लेगची लागण झाली. त्यामध्येच 10 मार्च 1897 रोजी रात्री नऊ वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपली पाठ जमिनीला टेकवली आणि ज्योत मावळली... सावित्रीबाई नावाची ही धगधगत मशाल समाजातील अज्ञान ,अंधकार, विषमता ,गुलामगिरी या विरोधात सुमारे 50 वर्ष अथकपणे संघर्ष आणि सेवा करीत लाखो लोकांच्या ,संपूर्ण स्त्रीजातीच्या जीवनाला प्रकाश देत विझुन गेली .
 *आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना* *कृतज्ञतापूर्वक नमन* 

 *जय सावित्री* 


 *वर्षा ज्ञानदेव ठाकरे(भगत)*
     कारंजा लाड, जि.वाशीम



Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे