8 जानेवारीला विभागीय लोकशाही दिन



8 जानेवारीला विभागीय लोकशाही दिन

वाशिम,दि.05 (जिमाका) महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे आयोजन 8 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय,अमरावती येथे करण्यात येणार आहे.तरी जिल्हयातील सामान्य नागरीकांनी तसेच महिलांनी त्यांच्या विभागीय लोकशाही दिनामधील व महिला लोकशाही दिनामधील तक्रार अर्ज तालुका व जिल्हा लोकशाही दिनात सादर केल्यानंतर विहीत नमुन्यात लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे. तसेच सदर तक्रार dcgamravati@gmail.com / dcg_amravati@rediffmail.com या ई-मेलवर विहीत नमुन्यात पाठवावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले आहे. 
                  *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे