कारंजा येथे राज्यस्तरीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा : जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या हस्ते उद्घाटन
कारंजा येथे राज्यस्तरीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या हस्ते उद्घाटन
वाशिम,दि.२७ (जिमाका) क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराश्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा आट्यापाट्या असोसिएशन व स्वा.से. श्री.क.रा.इन्नाणी महाविद्यालय, कारंजा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय आट्यापाट्या २०२४ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कारंजा येथील स्वा.से.श्री. क.रा.इन्नाणी महाविद्यालयाच्या प्रांगणात आज २७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांचे हस्ते करण्यात आले.
उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य,डाॅ.ए.एन. देवरे उपस्थित होते.व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, आट्यापाट्या संघाचे महाराष्ट्र कार्यकारीणी अध्यक्ष सागर गुल्हाणे, श्री.पी.डी.जैन,महाविद्यालय, अनसींगचे प्राचार्य डाॅ.विवेक गुल्हाणे, आट्यापाट्या संघाचे सचिव कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे आणि आट्यापाट्या संघाचे सर्व विभागीय विभाग प्रमुख व सदस्य उपस्थित होते.
प्राचार्य, डाॅ.देवरे यांनी खेळाचे महत्व विषद करून वर्तमानातील खेळाचे महत्व पटवून सांगीतले.जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी मार्गदर्शन केले व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
या क्रीडा स्पर्धेत १४,१७ आणि १९ या वयोगटातील राज्यातील आठही विभागातुन एकुण ५७६ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.प्रास्तावीक जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले.संचालन सुजीत देशमुख तर आभार प्राचार्य डाॅ.गुल्हाणे यांनी मानले.
स्पर्धेकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील श्री.सोनकांबळे,श्री. बोधळे,श्री.तिडके,श्री.मोरे, श्री.वैद्य सर्व आट्पाट्या संघटनेचे सर्व पदाधिकारी व खेडाळू यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment