14 जानेवारीला अमरावती येथे माजी सैनिक मेळावा
14 जानेवारीला अमरावती येथे
माजी सैनिक मेळावा
वाशिम,दि.09 (जिमाका) स्टेशन मुख्यालय,उत्तर महाराष्ट्र,गुजरात सब एरिया आणि स्टेशन मुख्यालय, पुलगाव यांच्या संयुक्त वतीने 14 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता जनरल ऑफिसर कमांडिंग उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात सब एरिया यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भातील अमरावती,अकोला,वाशिम,यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा व अवलंबितांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी जोग स्टेडीयम,पोलीस मुख्यालयाजवळ, अमरावती येथे माजी सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यामध्ये मराठा लाईट इन्फंट्री, महार रेजिमेंटचे रेकॉर्ड ऑफीस प्रतिनिधी,इसीएचएससीएस डी व स्पर्श संबंधित सुविधा उपलब्ध असणार आहे.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक/माजी सैनिक विधवा,वीर पत्नी आदींनी मेळाव्यास उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
*******
Comments
Post a Comment