दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5 रुपये अनुदान य ोजनेत सहभागासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले


दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5 रुपये अनुदान

योजनेत सहभागासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले

वाशिम,दि.16 (जिमाका) सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांना दुध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.शासनाने जाहीर केलेल्या 5 रुपये प्रतिलिटर दुधाच्या अनुदान योजनेत सहभागी होण्यासाठी सहकारी दुध संघांनी व खाजगी दुध प्रकल्पांनी विहीत नमुन्यात अर्ज आयुक्त,दुग्धव्यवसाय विकास विभाग,महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडे सादर करणे बंधनकारक आहे. 
               तरी या अनुदान योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्प यांनी डीबीटी करण्यासाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधारकार्डशी व पशुधनाच्या आधारकार्डशी (Ear Tag) संलग्न (लिंक) करणे आवश्यक आहे.या योजनेत जे दुध उत्पादक शेतकरी सहकारी दुध संघास व खाजगी प्रकल्पास दुध पुरवठा करतात,ते शेतकरी सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पामार्फत सहभागी होवू शकतात.या योजनेचा कालावधी 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत  आहे.
         या योजनेत सहभागी होणाऱ्या सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांनी आपला स्वतंत्र अर्ज संपूर्ण माहितीसह ddcmaharashtra@gmail.com या ई-मेल आयडीवर सादर करावा.असे आवाहन अकोलाचे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ.आर.एम.चव्हाण यांनी केले आहे.
                      *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे