जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 12 बालके हृदयशस्त्रक्रीयेसाठी मुंबईकडे रवाना* बालकांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पुष्पगुच्छ


*जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 12 बालके हृदयशस्त्रक्रीयेसाठी मुंबईकडे रवाना* 

बालकांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पुष्पगुच्छ

वाशिम,दि.09 (जिमाका) जिल्हा रुग्णालय,वाशिमच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी,शाळा व अंगणवाडयांमध्ये वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी केली जाते.जिल्हा रुग्णालय,वाशिम येथे 11 जून 2023 रोजी घेण्यात आलेले 2 डी इको संदर्भ सेवा शिबीरात बालकांच्या हृदयाची तपासणी केली.यामध्ये एकुण 22 बालकांच्या तपासणी दरम्यान हृदय शस्त्रक्रीयांची आवश्यकता दिसून आली.या 22 मुलांपैकी 10 मुलांच्या हृदयशस्त्रक्रीया ऑगस्ट 2023 मध्ये पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत पुर्णपणे मोफत करण्यात आल्या.
 
आज 9 जानेवारी रोजी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत उर्वरित दुसऱ्या टप्यात 12 मुलांवर मोफत हृदयशस्त्रक्रीया व उपचार महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत बालाजी हॉस्पीटल, भायखळा आणि कोकीळाबेन हॉस्पीटल,मुंबई येथे पाठविण्यात आले.या मुलांना उपचारासाठी पाठवितांना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अनिल कावरखे,वैद्यकीय अधिक्षक डॉ.लक्ष्मीकांत राठोड,बाहयरुग्ण संपर्क अधिकारी डॉ.पराग राठोड,डॉ. मडावी,पर्यवेक्षक आकाश ढोके, जिल्हा कार्यक्रम सहायक तुषार ढोबळे,सांख्यिकी अन्वेषक निलेश बुलबुले,प्रदिप भोयर,अनिल खडसे, जगदीश अढाव,दिशा राठोड व पुष्पा वेळुकार यांची उपस्थिती होती.
                    *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे