मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा जिल्हा न्यायालयात कायदेविषयक शिबीर उत्साहात
मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा
जिल्हा न्यायालयात कायदेविषयक शिबीर उत्साहात
वाशिम,दि.२३ (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ,वाशिम यांच्या संयुक्त वतीने १९ जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडयाच्या निमित्ताने कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.पी.पांडे होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अनुप बाकलीवाल यांची उपस्थिती होती.
न्या.श्री.पांडे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी ॲड.सुधीर मोरे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.सहायक मोटार वाहन निरीक्षक सतिश इंगळे यांनी रस्ता सुरक्षा आणि वाहतूक चिन्हे,रस्त्यावरील देवदुत आणि रस्ता संमोहन या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला सर्व न्यायीक अधिकारी,न्यायालयीन कर्मचारी, विधीज्ञ संघाचे पदाधिकारी सदस्य, विधी स्वयंसेवक,लोकअभिरक्षक कार्यालयाचे लोकअभिरक्षक व कर्मचारी,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे कर्मचारी व पक्षकारांची मोठया संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन हर्षा बारडे यांनी केले.प्रास्ताविक मुख्य लोकअभिरक्षक ॲड.परमेश्वर शेळके यांनी तर उपस्थितांचे आभार ॲड. राहुल पुरोहित यांनी मानले. कार्यक्रमानंतर लोकअभिरक्षक कार्यालयाचे उपमुख्य लोकअभिरक्षक ॲड. राजेश विसपुते,ॲड.हर्षा रामटेके,सहाय्यक लोकअभिरक्षक ॲड.अतुल पंचवाटकर व ॲड. शुभांगी खडसे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणअंतर्गत कार्यरत विधी स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले.
*******
Comments
Post a Comment