धनगर समाजातील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना



धनगर समाजातील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना

वाशिम,दि.05 (जिमाका) धनगर समाजातील लाभार्थ्यांकरीता घरकुल योजना राबविण्यात येते.राज्यातील भटक्या जमाती-क तथा धनगर समाजाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात व्यास्तव्यास असलेल्या भटक्या जमाती-क तथा धनगर समाजासाठी संपूर्ण राज्यात 10 हजार घरे बांधून देण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित केले आहे.या योजनेंतर्गत जिल्हयात ग्रामीण भागात व्यास्तव्यास असलेल्या भटक्या जमाती-क तथा धनगर समाजासाठी घरकुल योजना सहाय्यक संचालक,इतर मागास बहूजन मागास विभागाच्या वतीने राबविण्यात येते.या योजनेंतर्गत लाभार्थ्यास घर बांधण्यासाठी 1 लक्ष 20 हजार रुपये अनुदान देण्यात येते.
यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.(अधिवास प्रमाणपत्र), लाभार्थी भटक्या जमाती क तथा धनगर समाजाचा असावा. (जात प्रमाणपत्र), लाभार्थ्यांचे उत्पन्न 1 लक्ष 20 हजार रुपयापेक्षा जास्त नसावे (उत्पन्न प्रमाणपत्र), लाभार्थी भूमिहीन / अल्पभुधारक असावा (सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र), लाभार्थ्यांने यापूर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतला नसावा. लाभार्थ्यांच्या नावे कमीत कमी 30 चौ.मी. जागा असणे आवश्यक. (नमुना आठ अ) या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या व योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करावा.अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क करुन अर्ज सादर करावा.या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.असे आवाहन इतर मागास बहूजन कल्याण विभागाचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे. 
                   *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे