शिवस्मृती चित्र रांगोळी कलादालनाला* *हजारो विद्यार्थ्यांच्या भेटी*
*शिवस्मृती चित्र रांगोळी कलादालनाला*
*हजारो विद्यार्थ्यांच्या भेटी*
वाशिम दि.३१ (जिमाका) वाशीम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासन वाशिमच्या वतीने २७ ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० राज्याभिषेक वर्षानिमित्ताने आयोजित या महोत्सवात पटांगणावर शिवस्मृती चित्र - रांगोळी कला दालनाला जिल्ह्यातील विविध शाळांच्या हजारो विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.
शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगवेगळे चित्र रेखाटले आहे.या रेखाटलेल्या सर्व चित्रांचे एकत्रित प्रदर्शन महासंस्कृती महोत्सवात तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कलादालनात लावण्यात आले आहेत.तसेच या कलादालनात रिसोड येथील रांगोळी कलाकार प्रतीक्षा साबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ प्रतिमा रांगोळीतून साकारली आहे. जिल्ह्यातील विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांनी या कला दालनाला भेटी दिल्या.
Comments
Post a Comment