महाकृषी अभियान : लाभार्थी हिस्सा 7 दिवसाच्या आत भरावा*महाऊर्जाचे आवाहन

*महाकृषी अभियान : लाभार्थी हिस्सा 7 दिवसाच्या आत भरावा*

महाऊर्जाचे आवाहन

वाशिम,दि.२३ (जिमाका) महाकृषी अभियान योजनेअंतर्गत कुसुम ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त असलेल्या अर्जाची पडताळणी करुन पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना महाऊर्जा,मुख्यालय,पुणे यांच्याकडून लाभार्थी हिस्सा भरण्याचे संदेश पाठविले जातात.त्यानुसार वाशिम जिल्हयातील 195 लाभार्थी शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्याचा संदेश दिलेला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत लाभार्थी हिस्सा भरणा केलेला नाही. तरी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना महाऊर्जा,जिल्हा कार्यालय,यवतमाळ यांचेकडून वेळोवेळी पत्राव्दारे व भ्रमणध्वनीव्दारे लाभार्थी हिस्सा भरण्याबाबत कळविले आहे.लाभार्थी शेतकऱ्यांना महाऊर्जा,मुख्यालय,पुणे यांच्याकडून लाभार्थी हिस्सा भरणा करण्याकरीता ७ दिवसाची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
         तरी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी महाऊर्जा,मुख्यालय,पुणे यांच्यामार्फत प्राप्त झालेल्या संदेशानुसार ७ दिवसात MEDA Benificiary Application या ऑनलाईन ॲपव्दारे लाभार्थी हिस्सा भरणा करावा.लाभार्थी हिस्सा भरणा करतांना काही अडचणी आल्यास ०७२३२-२४११५० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा doyavatmal@mahaurja.com या ई-मेलवर संपर्क करावा.असे आवाहन यवतमाळ महाऊर्जाचे प्रकल्प कार्यकारी अधिकारी दिनेश सुरोशे यांनी केले आहे. 
                    *******

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर