मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाशिम हेलिपॅडवर स्वागत

वाशिम, दि. ०७ : वाशिम जिल्ह्यातील २३५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वाशिम येथे आले होते. यावेळी त्यांच्या समवेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील होते.
येथील पोलीस कवायत मैदानवरील हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदाताई देशमुख, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, नगराध्यक्ष लताताई उलेमाले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी स्वागत केले.
*****

Comments

Popular posts from this blog

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यान्वित

विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप