केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर शनिवारी वाशिम जिल्ह्यात
·
जिल्ह्यातील
5 आरोग्यवर्धिनी
केंद्रांच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती
वाशिम,
दि. 20 : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर हे शनिवार, दि. 22 सप्टेंबर 2018 रोजी
वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
श्री.
जावडेकर हे दि. 22 रोजी सकाळी 8
वाजता अकोला मोटारीने येथून शेलुबाजारकडे प्रयाण करतील. सकाळी 8.45
वाजता त्यांचे शेलुबाजार येथे आगमन होईल. याठिकाणी आयोजित
आरोग्यवर्धिनी केंद्राच्या (हेल्थ अँड वेलनेस सेंटर) उद्घाटन कार्यक्रमास ते
उपस्थित राहतील. सकाळी 9.30 वाजता ते शेलुबाजार येथून
किन्हीराजाकडे प्रयाण करतील. सकाळी 10 वाजता त्यांचे
किन्हीराजा येथे आगमन होईल व याठिकाणी होणाऱ्या आरोग्यवर्धिनी केंद्राच्या उद्घाटन
कार्यक्रमास ते उपस्थित राहतील.
श्री. जावडेकर हे सकाळी 11
वाजता ते किन्हीराजा येथून आसेगावकडे प्रयाण करतील. सकाळी 11.30
वाजता त्यांचे आसेगाव येथे आगमन होईल व येथील आरोग्यवर्धिनी
केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. दुपारी 12.30 वाजता ते आसेगाव येथून शेंदूरजनाकडे प्रयाण करतील. दुपारी 1 वाजता त्यांचे शेंदूरजना येथे आगमन होईल व याठिकाणी आयोजित आरोग्यवर्धिनी
केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. दुपारी 2 वाजता ते शेंदूरजना येथून वाशिमकडे प्रयाण करतील.
श्री.
जावडेकर यांचे दुपारी 2.30 वाजता वाशिम
शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. दुपारी 3 वाजता
ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील. दुपारी 3.30 वाजता ते वाशिम येथून केनवडकडे प्रयाण करतील. सायंकाळी 5 वाजता त्यांचे केनवड येथे आगमन होईल व याठिकाणी होणाऱ्या आरोग्यवर्धिनी
केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता ते केनवड येथून अकोलाकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment