मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या हस्ते ‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे विमोचन
·
‘सामर्थ्य शिक्षणाचे, समृद्ध महाराष्ट्राचे !’
विशेषांक
वाशिम, दि.
१० : माहिती व
जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या ‘सामर्थ्य
शिक्षणाचे, समृद्ध महाराष्ट्राचे !’ या सप्टेंबर महिन्याच्या विशेषांकाचे आज
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या हस्ते विमोचन
करण्यात आले.
यावेळी महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य
कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माहिती
सहाय्यक तानाजी घोलप, जि.प. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे संवाद तज्ज्ञ राम
शृंगारे यांची उपस्थिती होती.
‘लोकराज्य’च्या
या विशेषांकामध्ये राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेली राजर्षि छत्रपती शाहू
महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, आर्थिकदृष्ट्या
मागास विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, डॉ.
पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजना व वसतिगृह योजना, छत्रपती राजमाराम महाराज उद्योजकता
व कौशल्य विकास अभियान, शेतीपूरक कौशल्य प्रशिक्षण, अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी
असलेल्या योजनांसह इतर योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या योजनांवर आधारित
यशकथांचा समावेशही या अंकामध्ये आहे.
माजी
प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी त्यांच्या स्मृतींना दिलेला उजाळा यासह राजर्षि शाहू महाराज यांनी
शिक्षण क्षेत्रात केलेल्या क्रांतीविषयी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या लेखाचा
समावेश ‘लोकराज्य’च्या या विशेषांकात करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment