यंत्रणांनी वृक्ष लागवडीचे सूक्ष्म नियोजन करावे - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
३३
कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम
·
जिल्ह्यात ४२ लक्ष ३३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
वाशिम, दि. २५ : राज्य
शासनाच्या महत्त्वाकांक्षी ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेतील अंतिम टप्पा असलेल्या ३३
कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्याला ४२ लक्ष ३३ हजार वृक्ष
लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित
शासकीय यंत्रणांनी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी
लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या.
यावेळी
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, निवासी
उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी के. आर. राठोड, वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, लघु पाटबंधारे
विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी
अभियंता निलेश राठोड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी
(माध्यमिक) तानाजी नरळे यांच्यासह इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, दि. १ जुलै ते ३१ जुलै २०१९
या कालावधीत राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने
प्रत्येक जिल्ह्याला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यानुसार वाशिम
जिल्ह्याला प्राप्त झालेले उद्दिष्ट सर्व शासकीय विभागांना विभागून देण्यात आले
आहे. या उद्दिष्टानुसार सर्व यंत्रणांनी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही
सुरु करावी. या मोहिमेत सामाजिक वनीकरण विभाग व जिल्हा परिषदेचे भुमिका महत्त्वाची
असून त्यांनी त्यादृष्टीने आवश्यक नियोजन करावे. वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तसेच सामाजिक वनीकरण
विभागाच्या शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड योजनेतून जास्तीत जास्त वृक्ष लागवड
करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सहाय्यक वन संरक्षक श्री. वायाळ यांनी यंत्रणानिहाय
उद्दिष्ट व मोहिमेचे नियोजन याविषयी माहिती दिली.
Comments
Post a Comment