जिल्ह्यात १४ सप्टेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
वाशिम, दि. ०४ : कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी दि. ३१ ऑगस्ट ते दि.
१४ सप्टेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३)
नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीस
दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील
अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक
पदार्थ वाहून नेणे, दगड
किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स
प्रदर्शन करणे, वाद्य
वाजविणे,किंकाळ्या फोडणे किंवा
जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा, भाषणे
करणे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी कोणतीही कृती करण्यास मनाई करण्यात आली
आहे. अंत्ययात्रा, धार्मिकविधी, सामाजिक सण, लग्न सोहळे यांना हा आदेश लागू नाही, असे
जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. तसेच उपविभागीय अधिकारी यांना या आदेशामधून समोचित प्रकरणामध्ये अधिकार क्षेत्रामध्ये स्थानिक
पोलीस अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून सूट देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.
Comments
Post a Comment