कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन

राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अर्थिक लाभ मिळालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी ज्या बँकेतून पीक कर्ज त्या संबंधित बँकेच्या शाखांकडे योग्य त्या पुराव्यासह दि. ३१ जानेवारी २०१८ पर्यंत संपर्क साधावा व आपले पात्रता अथवा अपात्रतेबाबतची खातरजमा करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले आहे.
     शेतकरी सन्मान योजनेद्वारे ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरले असतील. परंतु ज्यांना या योजनेद्वारे अद्याप कोणतेही अर्थिक लाभ मिळालेले नाहीत. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँका व विदर्भ कोकण ग्रामीण बँक आदी बँकाच्या संबंधित शाखांमध्ये शाखानिहाय याद्या (न ताळमेळ झालेली) प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे आणि अद्याप या योजनेंतर्गत कोणतही अर्थिक लाभ मिळालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेल्या संबंधित बँकेच्या शाखांकडे योग्य त्या पुराव्यासह (ऑनलाईन अर्ज, कर्जखाते उतारा, आधारकार्ड इत्यादी) दि. ३१ जानेवारी २०१८ पर्यंत संपर्क साधावा, असे श्री. कटके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे