पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते राज्य उत्पादन शुल्क कार्यालय परिसरात वृक्षारोपण



वाशिम, दि. २९ (जिमाका) : गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज, २९ जून रोजी चिखली रोड येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक पोलीस अधीक्षक पवन बन्सोड, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश