पदवीधर मतदारसंघ निवडणूक आचारसंहिता नियंत्रण कक्षाची स्थापना
- Get link
- X
- Other Apps
पदवीधर मतदारसंघ निवडणूक
आचारसंहिता नियंत्रण कक्षाची स्थापना
वाशिम, दि. 06 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघ अमरावती विभाग निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. या निवडणूक कार्यक्रमानूसार 30 जानेवारी 2023 रोजी मतदान आणि 2 फेब्रुवारी 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीसाठी जिल्हास्तरावर आचारसंहिता नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील नैसर्गिक आपत्ती कक्षात स्थापन करण्यात आला आहे. हा नियंत्रण कक्ष नायब तहसिलदार तथा आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष नियंत्रण अधिकारी कैलास देवळे यांच्या नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे. या कक्षातील दूरध्वनी क्रमांक 07252-234238 आणि भ्रमणध्वनी क्रमांक 8379929415 हा आहे. आचारसंहितेबाबत तक्रारी/मार्गदर्शनासाठी उमेदवार, राजकीय पक्ष व मतदार यांना काही अडचणी असल्यास तसेच आचारसंहितेबाबतच्या तक्रारी असल्यास या क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. असे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी कळविले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment