क्रीडा स्पर्धेमुळे काम करण्यास ऊर्जा मिळते डॉ. दिलीप पांढरपट्टे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप अमरावती जिल्हा ठरला सर्वसाधारण विजेता

क्रीडा स्पर्धेमुळे काम करण्यास ऊर्जा मिळते

                                     डॉ. दिलीप पांढरपट्टे

विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप

अमरावती जिल्हा ठरला सर्वसाधारण विजेता

वाशिम, दि. 02 (जिमाका) :  ताणतणाव निवारण्यासाठी खेळासारखा उपचार नाही. शासकीय सेवेत काम करतांना प्रत्येकाने स्वत:साठी वेळ दिला पाहिजे. स्वत:ची तंदूरुस्ती बघीतली पाहिजे. त्यादृष्टीनेच क्रीडा क्षेत्रात देखील काम करावे. क्रीडा स्पर्धेत प्रत्येकाने सहभागी होण्याचा प्रयत्न करावा. क्रीडा स्पर्धेमुळेच काम करण्यास ऊर्जा मिळते. असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.

          आज 2 जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान आयोजित विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2022-23 चे बक्षिस वितरण डॉ. पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी वसुमना पंत होत्या, प्रमुख अतिथी म्हणून अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, अकोला अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, सहायक आयुक्त श्यामकांत मस्के, यवतमाळ निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, अकोला निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, वाशिम निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, उपजिल्हाधिकारी सर्वश्री संदिप महाजन, नितीन चव्हाण, सदाशिव शेलार, सुहासिनी गोणेवार, उमरखेड उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, मोर्शी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, बाळापूर उपविभागीय अधिकारी श्री. पुरी, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांची उपस्थिती होती.

         डॉ. श्री. पांढरपट्टे पुढे म्हणाले, प्रत्येकाने आपला छंद जोपासून कामाचे व स्वत:च्या खाजगी आयुष्याचे संतुलन ठेवले पाहिजे. उत्साहाने खेळले पाहिजे. खेळतांना माणूस भान हरपून खेळत असतो. अशाप्रकारच्या क्रीडा स्पर्धेच्या आयोजनातून दरवर्षी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना खेळण्याची संधी मिळते असे त्यांनी सांगितले.

         तीन दिवस चाललेल्या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम व बुलडाणा येथील 950 ते 1000 खेळाडू 22 क्रीडा प्रकारात व सांस्कृतीक स्पर्धेत सहभागी होते. या स्पर्धेत अमरावती जिल्हा सर्वसाधारण विजेता तर बुलडाणा जिल्हा उपविजेता ठरला. सांस्कृतिक कार्यक्रमात बुलडाणा जिल्हा प्रथम आणि पथसंचलनात विभागीय आयुक्त कार्यालयाचा संघ प्रथम विजेता ठरला.

           अमरावती जिल्हयातील वरुड तहसिलचे तलाठी देवानंद मेश्राम यांनी 3626 किलोमिटर अंतर सायकलने 11 दिवस 12 तासात पुर्ण केल्याबद्दल आणि अखिल भारतीय नागरी क्रीडा स्पर्धेत महेंद्र चव्हाण आणि अंकुश महाले यांनी प्रतिनिधीत्व केल्याबद्दल विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

         सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम बुलडाणा, व्दितीय यवतमाळ आणि तृतीय अकोला, पथसंचलनात प्रथम विभागीय आयुक्त कार्यालय, व्दितीय वाशिम आणि तृतीय यवतमाळ, कबड्डीत प्रथम वाशिम, व्दितीय अमरावती आणि तृतीय अकोला, फुटबॉलमध्ये प्रथम अमरावती, व्दितीय अकोला आणि तृतीय यवतमाळ, क्रिकेटमध्ये प्रथम यवतमाळ, व्दितीय अमरावती आणि तृतीय विभागीय आयुक्त कार्यालय, व्हॉलीबॉलमध्ये प्रथम अमरावती, व्दितीय यवतमाळ आणि तृतीय विभागीय आयुक्त कार्यालय, खो-खो स्पर्धेत (पुरुष) प्रथम यवतमाळ, व्दितीय अमरावती आणि तृतीय अकोला, खो-खो स्पर्धेत (महिला) प्रथम बुलडाणा, व्दितीय वाशिम आणि तृतीय यवतमाळ, धावणे 100 मिटर स्पर्धेत (पुरुष) प्रथम बुलडाणा, व्दितीय अकोला आणि तृतीय अमरावती, धावणे 100 मिटर स्पर्धेत (महिला) प्रथम बुलडाणा, व्दितीय अमरावती आणि तृतीय यवतमाळ, धावणे 200 मिटर स्पर्धा (पुरुष) प्रथम बुलडाणा, व्दितीय अमरावती आणि तृतीय यवतमाळ, धावणे 200 मिटर स्पर्धा (महिला) प्रथम अमरावती, व्दितीय बुलडाणा आणि तृतीय यवतमाळ, धावणे 400 मिटर स्पर्धा (पुरुष) प्रथम बुलडाणा, व्दितीय अमरावती आणि तृतीय यवतमाळ.

         रिले 100 मिटर बाय 4 स्पर्धा (पुरुष) प्रथम यवतमाळ, व्दितीय अमरावती आणि तृतीय बुलडाणा, रिले 100 मिटर बाय 4 स्पर्धा (महिला) प्रथम बुलडाणा, व्दितीय यवतमाळ आणि तृतीय अमरावती, बुध्दीबळ (पुरुष) प्रथम यवतमाळ, व्दितीय अमरावती आणि तृतीय बुलडाणा, बुध्दीबळ (महिला) प्रथम यवतमाळ, व्दितीय बुलडाणा आणि तृतीय अकोला, बॅटमिंटन एकेरी (पुरुष) प्रथम यवतमाळ, व्दितीय बुलडाणा आणि तृतीय अमरावती, बॅटमिंटन एकेरी (महिला) प्रथम बुलडाणा, व्दितीय अकोला आणि तृतीय अमरावती, बॅटमिंटन दुहेरी (पुरुष) प्रथम यवतमाळ, व्दितीय वाशिम आणि तृतीय अमरावती, बॅटमिंटन दुहेरी (महिला) प्रथम अकोला, व्दितीय अमरावती आणि तृतीय बुलडाणा, बॅटमिंटन एकेरी (पुरुष) 45 वर्षावरील प्रथम अमरावती, व्दितीय अकोला आणि तृतीय बुलडाणा, बॅटमिंटन एकेरी (महिला) 45 वर्षावरील प्रथम वाशिम, व्दितीय बुलडाणा आणि तृतीय विभागीय आयुक्त कार्यालय, बॅटमिंटन दुहेरी (पुरुष) 45 वर्षावरील प्रथम अमरावती, व्दितीय अकोला आणि तृतीय वाशिम, बॅटमिंटन दुहेरी (महिला) 45 वर्षावरील प्रथम वाशिम, व्दितीय अमरावती आणि तृतीय बुलडाणा, बॅटमिंटन मिश्र प्रथम यवतमाळ, व्दितीय बुलडाणा आणि तृतीय अकोला.

         टेबल टेनिस एकेरी (पुरुष) प्रथम बुलडाणा, व्दितीय अमरावती आणि तृतीय यवतमाळ, टेबल टेनिस एकेरी (महिला) प्रथम बुलडाणा, व्दितीय विभागीय आयुक्त कार्यालय आणि तृतीय अमरावती, टेबल टेनिस दुहेरी (पुरुष) प्रथम यवतमाळ, व्दितीय अमरावती आणि तृतीय वाशिम, टेबल टेनिस दुहेरी (महिला) प्रथम बुलडाणा, व्दितीय अमरावती आणि तृतीय वाशिम, टेबल टेनिस एकेरी (पुरुष) 45 वर्षावरील प्रथम अमरावती, व्दितीय यवतमाळ आणि तृतीय विभागीय आयुक्त कार्यालय, टेबल टेनिस एकेरी (महिला) 45 वर्षावरील प्रथम बुलडाणा, व्दितीय अमरावती आणि तृतीय वाशिम, टेबल टेनिस दुहेरी (पुरुष) 45 वर्षावरील प्रथम अमरावती, व्दितीय विभागीय आयुक्त कार्यालय आणि तृतीय वाशिम, टेबल टेनिस दुहेरी (महिला) 45 वर्षावरील प्रथम वाशिम, व्दितीय विभागीय आयुक्त कार्यालय आणि तृतीय बुलडाणा, टेबल टेनिस मिश्र प्रथम बुलडाणा, व्दितीय अमरावती आणि तृतीय विभागीय आयुक्त कार्यालय.

          लॉन टेनिस ऐकरी प्रथम बुलडाणा, व्दितीय वाशिम आणि तृतीय अकोला, लॉन टेनिस दुहेरी प्रथम बुलडाणा, व्दितीय अकोला आणि तृतीय वाशिम, लॉन टेनिस ऐकरी वय 45 वर्षावरील प्रथम विभागीय आयुक्त कार्यालय, व्दितीय बुलडाणा आणि तृतीय अकोला, लॉन टेनिस दुहेरी वय 45 वर्षावरील प्रथम अमरावती, व्दितीय बुलडाणा आणि तृतीय विभागीय आयुक्त कार्यालय, कॅरम एकेरी (पुरुष) प्रथम अमरावती, व्दितीय वाशिम आणि तृतीय अकोला, कॅरम एकेरी (महिला) प्रथम अमरावती, व्दितीय यवतमाळ आणि तृतीय वाशिम, कॅरम दुहेरी (पुरुष) प्रथम अमरावती, व्दितीय वाशिम आणि तृतीय विभागीय आयुक्त कार्यालय, कॅरम दुहेरी (महिला) प्रथम यवतमाळ, व्दितीय अकोला आणि तृतीय अमरावती.

          भालाफेक (पुरुष) प्रथम अमरावती, व्दितीय अकोला आणि तृतीय विभागीय आयुक्त कार्यालय, भालाफेक (महिला) प्रथम वाशिम, व्दितीय बुलडाणा आणि तृतीय अमरावती, गोळाफेक (पुरुष) प्रथम बुलडाणा, व्दितीय वाशिम आणि तृतीय यवतमाळ, गोळाफेक (महिला) प्रथम बुलडाणा, व्दितीय अमरावती आणि तृतीय यवतमाळ, लांब उडी (पुरुष) प्रथम यवतमाळ, व्दितीय अकोला आणि तृतीय बुलडाणा, लांब उडी (महिला) प्रथम अमरावती, व्दितीय बुलडाणा आणि तृतीय यवतमाळ, उंच उडी (पुरुष) प्रथम यवतमाळ, व्दितीय अकोला आणि तृतीय अमरावती, उंच उडी (महिला) प्रथम बुलडाणा, व्दितीय अमरावती आणि तृतीय वाशिम, जलद चालणे (पुरुष )5 कि.मी प्रथम बुलडाणा, व्दितीय अकोला आणि तृतीय अमरावती, जलद चालणे (महिला) 3 कि.मी प्रथम बुलडाणा, व्दितीय अकोला आणि तृतीय अमरावती, थ्रो बॉल (महिला) प्रथम अमरावती, व्दितीय विभागीय आयुक्त कार्यालय आणि तृतीय बुलडाणा, रिंग टेनिस एकेरी (महिला) प्रथम अमरावती, व्दितीय बुलडाणा आणि तृतीय वाशिम, रिंग टेनिस दुहेरी (महिला) प्रथम अमरावती, व्दितीय वाशिम आणि तृतीय यवतमाळ, थाळीफेक (पुरुष) प्रथम अमरावती, व्दितीय वाशिम आणि तृतीय यवतमाळ, थाळीफेक (महिला) प्रथम यवतमाळ, व्दितीय बुलडाणा आणि तृतीय अमरावती हे पुरस्काराचे मानकरी ठरले. स्पर्धेतील विजेत्यांना पदके आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.  

          क्रीडा ध्वज पुढील स्पर्धेसाठी विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे यांनी अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना सुपूर्द केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांनी केले. यावेळी अकोला निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी खेळाडूंच्या वतीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शाहू भगत व गौरी हाडे यांनी केले. यावेळी अमरावती महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वझीरे, लेखाधिकारी युसूफ शेख, नायब तहसिलदार, जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक धर्मराज चव्हाण यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.  

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश