प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनातालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न 

वाशिम दि.३१ (जिमाका) आत्मा कार्यालय,वाशिम येथे तालुका कृषि अधिकारी,वाशिम कार्यालयाच्या वतीने आज ३१ जानेवारी रोजी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.उद्घाटन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार  यांनी केले.
          कार्यशाळेला मार्गदर्शन करताना श्री.तोटवार यांनी सूक्ष्म अन्नप्रक्रिया यावर आधारित उद्योग धंद्याचे महत्त्व तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये शेतकरी शेतमजूर तरुण बेरोजगार यांना असलेली संधी व त्या संधीचे सोने करण्याकरीता या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थींनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
           प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र,करडा येथील कार्यक्रम सहायक श्रीमती शुभांगी वाटाणे यांनी विविध प्रक्रिया उद्योगावर मार्गदर्शन केले.जिल्हा संसाधन व्यक्ती गोपाल मुठाळ यांनी  योजना राबविण्याचे अनुषंगाने विविध तांत्रिक बाबी व योजनेच्या लाभार्थींनी करावयाच्या सुधारणांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
              जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री दिनेश बारापात्रे, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा समन्वयक श्री. पंडित यांची प्रमुख उपस्थिती लाभली.       
         कार्यशाळेचे प्रास्ताविक वाशिम तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड  यांनी केले.सूत्रसंचालन व आभार   तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयकृष्ण लव्हाळे यांनी मानले. 
            कार्यशाळा यशस्वीतेसाठी   वाशिमचे मंडळ कृषी अधिकारी अनिल कंकाळ,अनसिंगचे मंडळ कृषी अधिकारी भागवत किंगर, प्रकाश कोल्हे कृषी अधिकारी वाशिम,कृषी पर्यवेक्षक राजेश राठोड,सुनील वाळूकर, भागवत नागरगोजे,श्रीरंग चवरे ,नितीन उलेमाले,वाशिम तालुक्यातील कृषी सहाय्यक यांचे सहकार्य लाभले.
                कार्यशाळेला वाशिम तालुक्यातील वैयक्तिक लाभार्थी शेतकरी,शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनीचे शेतकरी, महिला बचत गट यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश